आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्यापासून तीन दिवस बँका राहणार बंद, संप जाेडून सुट्यांचा परिणाम

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - बँकांचे काही कामकाज असेल तर अाजच उरकून घ्या, कारण महाराष्ट्र स्टेट बँक एम्प्लाॅईज असाेसिएशनने पुकारलेला शुक्रवारचा एकदिवसीय संप अाणि जाेडून अालेल्या दाेन सुट्यांमुळे सलग तीन दिवस बँका बंद राहणार अाहेत. या देशव्यापी संपात पाच लाख कर्मचारी सहभागी हाेणार अाहेत. त्यामुळे सर्व राष्ट्रीयीकृत, ‘अाेल्ड जनरेशन’मधील बारा खासगी अाणि अाठ विदेशी बँकांचे कामकाज ठप्प हाेणार अाहे. अाज रात्री १० वाजेपासून साेमवारी सकाळपर्यंत क्लिअरिंग हाउसचे कामही थंडावेल.

स्टेट बँक अाॅफ म्हैसूर, स्टेट बँक अाॅफ हैद्राबाद, स्टेट बँक अाॅफ बिकानेर-जयपूर, स्टेट बँक अाॅफ पटियाला स्टेट बँक अाॅफ त्रावणकाेर या स्टेट बँकेच्या पाच सहयाेगी बँकांचे विलीनीकरण स्टेट बँकेत करण्याच्या निर्णयाविराेधात हा संप पुकारण्यात अाला अाहे. असाेसिएशनचे जनरल सेक्रेटरी विश्वास उटगी यांनी सांगितले की, या प्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी जानेवारीलाच मुंबईतील अाझाद मैदानावर रॅली काढण्यात येणार अाहे. स्टेट बँकेने २००८ मध्ये स्टेट बँक अाॅफ साैराष्ट्र २०१० मध्ये स्टेट बँक अाॅफ इंदाैर या चांगल्या नफ्यातील सहयाेगी बँकांचे जबरदस्तीने विलीनीकरण करून घेतले. अाता अन्य पाच सहयाेगी बँकांच्याही विलीनीकरणाचा प्रयत्न सुरू अाहे. स्टेट बँक सहयाेगी पाच बँकांतील कर्मचाऱ्यांच्या युनियनबराेबर काेणत्याही वाटाघाटी करीत नाही स्टेट बँकेच्या काही अन्यायकारक सेवाशर्ती सहयाेगी कर्मचाऱ्यांवर लादण्याचा प्रयत्न व्यवस्थापन करीत अाहे.

घरबांधणी कर्ज, अनुकंपा तत्त्वावरील भरतीसारखे हक्क सहयाेगी बँकांच्या सभासदांना नाकारले अाहेत. या पाच सहयाेगी बँका कायद्यान्वये स्टेट बँकेपासून विभक्त कराव्यात, अशी मागणी अाॅल इंडिया स्टेट बँक एम्प्लाॅईज असाेसिएशनने केली अाहे.

या बँकांमुळे मिळणार दिलासा
अायसीअायसीअाय,येस बँक, अॅक्सिस बँक या नव्या जनरेशनमधील खासगी बँका मात्र सुरू राहणार अाहेत. याशिवाय एटीएम फुल राहतील. तसेच अाॅनलाइन बँकिंग, क्रेडिट-डेबिट कार्डचाही पर्याय ग्राहकांना उपलब्ध असेल.
बातम्या आणखी आहेत...