आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एलबीटी विरोधातील आंदोलन उद्यापासून

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- नाशिक महानगर व्यापारी संघ व राज्यपातळीवरील फेडरेशन ऑफ असोसिएशन ऑफ र्मचंट्स यांच्या वतीने एलबीटी विरोधात पुकारण्यात आलेल्या दोनदिवसीय व्यापार बंद आंदोलनाला सोमवारपासून सुरुवात होईल. या आंदोलनाच्या तयारीने चांगलीच गती घेतली असून, एलबीटीचे दुष्परिणाम व्यापार्‍यांसह ग्राहकांपर्यंतही पोहोचविण्यासाठी नानाविध प्रकारे प्रचार-प्रसार केला जातो आहे. त्यात रिक्षांद्वारे राज्यपातळीवरील विविध नेत्यांची भाषणे करून ऐकविली जात आहेत.

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठवडाभरापासून तालुकापातळीवरील बैठकांद्वारे व्यापार्‍यांना एकीचे महत्त्व पटवून दिले जात असून, शंभर टक्के व्यापारी बंदमध्ये सहभागी होतील, असा आशावाद व्यापारी नेत्यांनी व्यक्त केला आहे. एलबीटी रद्द करावा, या प्रमुख मागणीसाठी व्यापार्‍यांचे हे आंदोलन होत असून, त्याची तयारी सुरू झाली आहे. आंदोलनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी 13 जुलै रोजी सोलापूर येथे राज्यस्तरीय व्यापारी परिषद घेण्यात आली. राज्यासह शहरातील काही व्यापारी 14 जुलै रोजी मुंबईत दाखल होणार असून, आमदार निवासात जाऊन विधिमंडळ सदस्यांची भेट घेऊन त्यांनीही सभागृहात एलबीटीला विरोध करावा, अशी मागणी ते करणार आहेत. 15 व 16 जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनातून राज्य सरकारचा निषेध केला जाणार आहे. आंदोलन काळात किरकोळ व ठोक विक्रेत्यांची दुकाने बंद राहणार असल्याची माहिती ‘फाम’चे उपाध्यक्ष प्रफुल्ल संचेती यांनी दिली.

आजच करा खरेदी चीजवस्तूंची
सोमवार व मंगळवार या दोनदिवसीय आंदोलनात व्यापारी दुकाने बंद ठेवणार आहेत. त्यामुळे किराणा, धान्य, पेट्रोल-डिझेल यांसारख्या गरजेच्या चीजवस्तूंच्या खरेदीसाठी नाशिककरांना रविवारी घराबाहेर पडावे लागणार आहे.