आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Fuel Make By Banana Out Side Skin, Sinner Students Solution

केळीच्या सालीपासून इंधनाची निर्मिती, सिन्नरच्या विद्यार्थ्‍याचे नामी उपाय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिन्नर - इंधनाचा प्रश्न दिवसेंदिवस जटिल होत असताना, ठाणगाव (ता. सिन्नर)च्या विद्यार्थ्यांनी मात्र त्यावर नामी उपाय शोधला आहे. केळीच्या सालीपासूनच त्यांनी स्थायूरूप जैविक इंधनाची निर्मिती केली आहे. कमी वेळेत, कमी इंधनात अधिक तापमान मिळून तसेच धूर कमी होत असल्याने प्रदूषणही कमी होत असल्याने हा प्रकल्प चर्चेचा ठरला आहे. राष्ट्रीय विकासाबरोबरच सामाजिक बांधिलकीही जपली जात असल्याने या प्रकल्पाची निवड भोपाळ येथील राष्ट्रीय प्रदर्शनासाठी झाली आहे.
हृषिकेश बबन आंधळे याच्या नेतृत्वाखाली जीवन गवई, दशरथ काकड, पंकज बैरागी, सौरभ काकड यांनी हा प्रकल्प तयार केला. शिरूर (पुणे) येथे झालेल्या 21 व्या राज्यस्तरीय बालविज्ञान परिषदेत या प्रकल्पाची ‘अ’ र्शेणीत निवड झाली आहे. सांख्यिकी माहितीबरोबर तुलनात्मक बाजूही सूत्रबद्ध पद्धतीने मांडल्याने या बालवैज्ञानिकांनी राष्ट्रीय स्तरापर्यंत मजल मारली आहे. या विद्यार्थ्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
बालवैज्ञानिकांचा गौरव
विद्यार्थ्यांच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अँड. रावसाहेब शिंदे, विभागीय संचालक अँड. भगीरथ शिंदे, एन. एम. आव्हाड, सरपंच नामदेव शिंदे, शालेय समितीचे रामचंद्र काकड, बालविज्ञान परिषदेच्या जिल्हा समन्वयक जया कासार, प्राचार्य ए. आर. वसावे, व्ही. एस. कवडे यांनी त्यांचा गौरव केला.