आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

केमिस्टनी वाचविले 6209 डॉलर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - इंधन बचतीसाठी ‘दिव्य मराठी’ने केलेल्या ‘या बिंदूचा सिंधू होवो’ या अभियानाच्या तिसर्‍या दिवशी शहरातील केमिस्ट अँण्ड ड्रगिस्टने उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याने गुरुवारी त्यांनी देशाचे 6209 डॉलर वाचविले. केमिस्ट अँण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या 1800 सदस्यांशिवाय त्यांच्याकडील कर्मचारी आणि विविध औषध कंपन्यांचे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह यांनीही ‘नो व्हेइकल डे’ अभियानात सहभाग घेतला. दिवसभरात किमान एक हजार कार आणि दीड हजार मोटारसायकलींना विर्शांती मिळाली. औषध विक्रेत्यांकडील कर्मचार्‍यांनीही अभियानात सहभाग घेतला. गुरुवारी अभियानांतर्गत किमान अडीच हजार वाहने रस्त्यावर न उतरल्याने 4016 लिटर पेट्रोल आणि 666 लिटर डिझेल दिवसभरात वाचले. ज्याची रुपयातील किंमत 3,83,534 आहे. किरकोळ, ठोक औषध विक्रेते आणि त्यांच्याकडील कर्मचार्‍यांनी दैनंदिन कामकाजासाठी बस, शेअररिक्षा आणि पायी प्रवास करीत इंधन बचतीचा जागर पुढे नेला. दर आठवड्यातील एक दिवस याचप्रकारे ‘नो व्हेइकल डे’ जाहीर करावा आणि काही भागांत नो व्हेइकल झोन जाहीर करावा, अशी मागणीही यानिमित्ताने पदाधिकार्‍यांनी केली.

सर्वांमध्ये उत्साह
लालबहादूर शास्त्री पंतप्रधान असताना देशासमोर उभ्या ठाकलेल्या संकटामुळे त्यांनी एक दिवस उपवास करण्याचे आवाहन जनतेला केले होते, ते जनतेने पाळले. आजही काही अंशी तशीच स्थिती असून, इंधन बचतीची गरज आहे. त्याकरिता वाहने घरी लावून एक दिवस कामावर येण्याचे आवाहन आम्ही केले होते, त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सर्वांमध्येच देशभक्ती आणि उत्साह दिसून येत होता. - सुरेश पाटील, माजी अध्यक्ष, फार्मसी काउन्सिल

सायकलने येणार
मी नंदुरबारला असल्याने रात्री नाशिकला पोहोचेन. पण, शुक्रवारी सकाळी माझ्यासह सर्व कार्यालयीन सहकारी आम्ही सायकलने कार्यालयात जाऊन ‘नो व्हेइकल डे’ साजरा करणार आहे. अधिकाधिक संघटनांनीदेखील या उपक्रमात सहभागी व्हावे. - संजय सबनीस, जिल्हा क्रीडा अधिकारी