आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहशतवाद्यांवर खर्च नकाेच, त्वरित फाशी द्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जाे कुणी निरपराधांचा जीव घेत असेल, त्याच्यावर काेट्यवधी खर्च करू नका. खटले झटपट चालवून त्वरित फासावर लटकवा, अशा शब्दांत माध्व संप्रदायाचे श्रीमहंत महामंडलेश्वर फुलडाेल बिहारीदासजी महाराज यांनी संतप्त भावना व्यक्त केल्या...

चतु:संप्रदाय अाखाडा हा तिन्ही अनी अाखाड्यांसह वैष्णवांचे ‘सुप्रीम काेर्ट’ मानले जाते. वैष्णव अथवा अनी अाखाड्यांतील काेणत्याही वादाबाबत या अाखाड्यात हाेणा-या बैठकीत चारही संप्रदायांच्या प्रमुखांनी दिलेला निर्णय हाच अंतिम मानला जाताे. त्या पार्श्वभूमीवर वैष्णवांच्या चार संप्रदायांपैकी माध्व संप्रदायाचे (त्यालाच ब्रह्म माध्व गाेडेश्वर असेही अाेळखले जाते.) प्रमुख श्री महंत महामंडलेश्वर फुलडाेल बिहारीदासजी महाराज यांच्याशी झालेल्या प्रश्नाेत्तरांचा हा सारांश.
तुमच्या अाखाड्यासमाेर महिला अाखाड्याबाबतचा विवाद अाल्यास तुमची काय भूमिका असेल?
हिंदू हा सनातन धर्म असून, नारीशक्तीचा सर्वाधिक सन्मान याच परंपरेत केला जाताे. काेणताही देश त्यांच्या देशाला माता म्हणताे का? अाम्ही माता म्हणताे. कुणालाही नाव विचारताना बेटा तुझ्या ‘अाई - वडिलांचे’ नाव काय? असेच विचारतात. कधी कुणाच्या ताेंडून ‘कृष्ण, राधा’ येतं का? नेहमी ‘राधेकृष्ण’ म्हटले जाते, कुणी ‘रामसीता’ म्हणत नाही, ‘सीताराम ’ म्हणतात. ही अापली संस्कृती अाहे. मात्र, ज्याप्रमाणे बाप अाई बनू शकत नाही, त्याप्रमाणेच अाई कायम अाईच असते. त्यामुळे जर महिला अाखाड्याची परंपरा नसेल तर त्यावर काय भूमिका घेणार. जे परंपरेत नाही, ते करता येणार नाही, हीच अामची भूमिका असेल.

सनातन धर्मात काही भिन्न नवीन निर्माण हाेऊच शकत नाही का ?
नवीन निर्माण करणे याेग्य अाहे. मात्र, काही विचित्र, विवादास्पद निर्माण हाेण्यापेक्षा अाहे तेच कायम राखले तरी बरेच काही शक्य हाेते. लाेहपुरुष सरदार पटेलांनी परंपरेचे पालन करून नियमानुसार हैदराबादसह शेकडाे संस्थाने विलीन करून घेतली. परंपरा ताेडून तत्कालीन पंतप्रधान पंडित नेहरू यांनी जम्मू-काश्मीरमध्ये लक्ष घातले, त्यांना स्वतंत्र झेंडा, स्वतंत्र संविधानाला मंजुरी दिली त्याचीच कटू फळे अाजही सैन्यदलासह सामान्य जणांना भाेगावी लागत अाहेत. असे काही नवीन निर्माण करण्याएेवजी सनातन धर्मात परंपरा पालन
हाच मुख्य धर्म सांगितला अाहे.
कुंभमेळ्यावरही दहशतीचे सावट असून त्याबाबतच्या सुरक्षा व्यवस्था पुरेशा वाटतात का?
कुंभमेळ्यावरच नव्हे पूर्ण देशावरच दहशतीचे सावट अाहे. अामच्या कुंभमेळ्यांमधील तीन अनी अाखाड्यांचे साधू समाजाचे रक्षण करण्यासाठी सज्जच असतात. परंतु देशात दहशतवाद्यांविरुद्ध काय चाललेय तेच समजेनासे झाले अाहे. दहशतवाद्यावर खर्च करण्यापेक्षा त्वरित न्यायालयीन प्रक्रिया पार पाडून फासावर लटकवले पाहिजे.