आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐन सिंहस्थात रोलेट, बिंगो, मटक्यांची महापर्वणी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - झटपटपैसे कमविण्याचे आमिष दाखवून तरुणांना जुगाराकडे आकर्षित करण्यासाठी नानाविध फंडे अवलंबले जात आहेत. त्यामुळे बहुतांश नवीन पिढीला सहजासहजी कळणारा तीन पत्तीचा खेळ मोबाइलद्वारे खुला करण्यात आला. अर्थात त्यास खेळाचा दर्जा असल्यामुळे कारवाईत अडचणी आल्या. दरम्यान, सिंहस्थाच्या धामधुमीत पोलिस व्यस्त असल्याचे बघून अवैध धंदे करणाऱ्यांनी पुन्हा पाय पसरले आहे. मध्यंतरी ‘दवि्य मराठी’ने रोलेटच्या नादात बरबाद झालेल्या युवकांवर प्रकाश टाकल्यानंतर तत्कालीन आयुक्त सरंगल यांनी अवैध धंद्यांच्या मुसक्या आवळल्या होत्या. शहरातून बहुतांश जुगाराचे खेळ हद्दपार झाले होते. मात्र, आता पुन्हा शहरातील प्रमुख भागांत, महावदि्यालयांलगत जुगाराचे प्रकार सुरू झाल्यामुळे पोलिसांना आव्हान, तर पालकांना चिंतेत टाकणारी बाब समोर आली आहे.

पुन्हाफोफावले अवैध धंदे
सातपूरपोलिस ठाण्याच्या हद्दीत मागील दोन महनि्यांपासून सर्वच भागांत अवैध धंद्यांना ऊत आला आहे. येथील अवैध धंदे बंद करण्यासाठी पोलिसांकडे नविेदनेही देण्यात आली. मात्र, नागरिकांच्या नविेदनांना केराची टोपली दाखविण्यात आली आहे. विशेष म्हणजे, टाऊन पोलिस चौकीच्या मागील कोळीवाडा परिसरात खुलेआम अवैध धंदे सुरू आहेत. या वसाहतीत सुरू असलेल्या अवैध धंद्यांमुळे कोळीवाडा परिसर बदनाम होत असल्याने काही नागरिकांनी पोलिस उपायुक्तांकडे सातपूर पोलिस ठाण्यात लेखी तक्रार अर्ज केले आहेत. मात्र, त्याचा काहीही उपयोग झालेला नाही.
सचनि गोरे, गुन्हेशाखेचे सहायक पोलिस आयुक्त

भद्रकालीत दररोज होतेय लाखोंची उलाढाल...
अवैधधंद्यांचे माहेरघर म्हणून ओळख असलेल्या भद्रकाली परिसरात सर्वच प्रकारांच्या अवैध धंद्यावाल्यांनी बस्तान मांडल्याचे अनेक घटनांतून उघड झाले. त्यामुळेच की काय, भद्रकाली पोलिसांत वर्णी लावण्यासाठी पोलिस निरीक्षकांमध्येच मोठ्या प्रमाणात रस्सीखेच असते. बागवानपुरा परिसरात दोन ठिकाणी, कथडा परिसरातील मशदिीलगत, वडाळानाका परिसरातील रेणुकानगर अशा अनेक ठिकाणी अवैध धंदे सुरू असल्याचे सांगितले जाते. यात जुगाराचे अड्डेच नव्हे तर चरस-गांजासारख्या अमली पदार्थांचीही सर्रास विक्री होते.

‘काठी फिराव’चेदेखील पोलिसांसमोर आव्हान...
सातपूरगावात सुरू करण्यात आलेल्या अवैध धंद्यांमध्ये ‘काठी फिराव’ नावाचा जुगार चांगलाच प्रसदि्ध होत असून, हा जुगार खेळण्यासाठी खास नाशिक शहरातील शौकीन कोळीवाडा, श्रमिकनगर, अशोकनगर, अंबड, एक्स्लो पॉइंट या ठिकाणी रोज हजेरी लावत आहेत. या जुगारात लाखो रुपयांची उलाढाल होते, असे खेळणाऱ्यांनी खासगीत सांगितले. या नव्याने सुरू झालेल्या प्रकाराने पोलिस प्रशासनापुढे आव्हान उभे ठाकले आहे.

द्वारका परिसरात टेबल टाकून ‘धंदा’
द्वारकायेथील सर्व्हिसरोडलगत दररोज सायंकाळी ते या दोन तासांच्या वेळेत रस्त्यावर टेबल मांडून ग्राहकांना दुप्पट पैशांचे आमिष दाखविले जाते. विशेष म्हणजे, टेबल लावण्यात येणारा जुगार खेळणारी बहुतांश माणसे त्यांचीच असतात. त्यांना पैसे जिंकतानाचे बघून या ठिकाणाहून ये-जा करणारे प्रवासी या आमिषाला बळी पडून हजारो रुपये हरतात. या परिसरात गस्तीवर असलेले पोलिस सोयीस्कररित्या टेबल मांडून बसणाऱ्यांकडे दुर्लक्ष करत असल्याचाही अनुभव प्रतिनिधीस आला.

कॉलेजरोडला होतेय वदि्यार्थ्यांची लूट
अवैधधंदेवाल्यांनी पैसे कमविण्यासाठी महावदि्यालयीन तरुणांनाही सोडलेले नाही. काॅलेजरोडवरील एका पेट्रोलपंपालगत चक्क व्हिडिओ गेमच्या परवानगीचा फलक झळकावून प्रत्यक्षात तेथे रोलेट, चक्री अंदर-बाहर या जुगाराच्या प्रकारांद्वारे तरुणांना गंडवले जात आहे. बाहेरून संपूर्ण बंद असलेल्या या ठिकाणावरील अड्ड्यावर छोटासा पडदा लावलेल्या दरवाजातून खेळींना प्रवेश दिला जातो. अर्थात येथे नजर ठेवण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे, बाऊन्सरही आहे. संबधित जागेबाबत पोलीस मुग गिळून गप्प आहेत.
हे आहेत ‘हाॅट स्पाॅट’
पोलिसांचेभयच उरले नसल्याची स्थिती असून, मोक्याच्या ठिकाणी छुप्या पद्धतीने अवैध धंदे सुरूच आहेत. सीबीएस येथील सुरुची हाॅटेल परिसर, अंबड हद्दीतील एक्स्लौ पाॅइंट, दोंदे मळा परिसर, गोविंदनगर, महाराणा प्रताप चौक, सातपूर विभागातील नासर्डी नदीचा पूल, कोळीवाडा, महिंद्रा कंपनीच्या मटेरियल गेटसमोरचा परिसर, गंगापूर विभागात आनंदवलीतील पेट्रोलपंपालगत, गंगापूरगाव, शविाजीनगर, पंचवटी विभागात हिरावाडी, इंद्रकुंड, पेठफाटा, मालेगाव स्टॅण्ड.

३० रुपयांचा ‘मटका’
भद्रकालीपरिसरातील काही अवैध धंद्यांना प्रतिनिधिक स्वरूपात भेटी दिल्यावर येथे मटक्याचा धंदा तेजीत असल्याचे दिसले. चौक मंडई परिसरातील एका धंद्यावर आम्ही पुराव्यादाखल चिठ्ठी मिळविण्यासाठी ३० रुपयांचा मटका लावला. या ठिकाणी पाहणी केली असता, भल्या मोठ्या गोडावूनमध्ये वेगवेगळ्या प्रकारातील जुगार खेळविले जात होते. असेच चित्र शहरातील दंडे हनुमान चौक परिसर शविाजीनगर परिसरातदेखील दिसून आले.
विशेष पथकांद्वारे कारवाई करणार...
सिंहस्थाच्या धामधुमीत नाशिक शहरात अवैध धंद्यांनी चांगलेच तोंड वर काढल्याचे चित्र असून, ‘डी.बी. स्टार’च्या पाहणीत शहरात रोलेट, बिंगो, तीन पत्तीपासून तर काठी फिरावसारखे अनेक तरुणांना देशोधडीला लावणारे प्रसंगी पैसे नसल्यास लुटमारीस प्रवृत्त करण्यासारखे जुगारांचे प्रकार सुरू असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे, चोरी छुपे नव्हे तर खुलेआम उघडपणे अवैध धंदे मोक्याच्या ठिकाणीच सुरू असल्यामुळे पोलिसांना याबाबत कानावर हात ठेवण्याची सबबही उरली नसल्याचे दिसते. तत्कालीन पोलिस आयुक्त कुलवंतकुमार सरंगल यांच्या दणक्यामुळे बंद झालेले अवैध धंदे पुन्हा सुरू झाल्याने आता वदि्यमान पोलिस आयुक्त जगन्नाथन यांच्यासमोर विखारी खेळापासून तरुणांना वाचवण्याचे आव्हान आहे. त्यावर ‘डी.बी. स्टार’चा प्रकाशझोत...
पोलिसांच्या संशयास्पद दुर्लक्षामुळे शहरात अवैध धंद्यांचा धुमाकूळ
- ऐन सिंहस्थाच्या काळात शहरात सर्वत्र अवैध धंदे फोफावले आहेत. त्यांच्यावर कठोर कारवाई का केली जात नाही?
अवैधधंद्यांची माहिती मिळताच आम्ही त्या ठिकाणी छापा टाकून कारवाई करीत असतो.

-सध्या कॉलेजरोड, भद्रकाली, पंचवटी, सातपूर परिसरात काठी फिरव, बॉलगेम, मटका यांसारखे अवैध धंदे खुलेआम सुरू आहेत, त्याची माहिती आहे का?
काहीठिकाणची माहिती आम्हाला आजच मिळाली असून, त्या ठिकाणी लवकरच कारवाई होणार आहे. आमची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

-सातपूरला तर टाऊन पोलिस चौकीच्या पाठीमागेच अवैध धंदे सुरू आहेत, त्याचे काय?
असेअसेल तर, याबाबतची माहिती घेऊन तातडीने कारवाई करणार आहोत.