आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भगूरला जुगार अड्ड्यावर छापा; २२ जण अटकेत, संशयितांविरोधात गुन्हा दाखल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- भगूरयेथील हॉटेल गारवाजवळ पोलिसांनी टाकलेल्या छाप्यात सहा लाखांच्या मुद्देमालसह २२ जणांना अटक करण्यात आली. देवळाळी कँप पोलिस ठाण्यात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विजय मधुकर भागवत (४२, मोरवाडी गल्ली, भगूर) भगूर येथील हॉटेल गारवाजवळ अवैध जुगार अड्डा चालवत असल्याची माहिती मिळाली होती. मंगळवारी (दि. २४) रात्री देवळाळी कँप पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी अड्ड्यावर छापा टाकला. या कारवाईत २२ जणांना अटक करण्यात आली असून लाख ९० हजार ८४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. यात ८० हजार ८४० रोख रक्कम, १८ मोबाइल, एक टीव्हीचा समावेश आहे.
या छाप्यानंतर शहरातील भद्रकाली, पंचवटी सिडको भागांसह इतर भागातील अड्ड्यंावरही छापे टाकून कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.