आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सुटीमध्ये बदलला खेळण्यांचा ट्रेंड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - सुटीमध्ये खेळण्यासाठी आता बालगोपाळांची विविध प्रकारच्या खेळण्या खरेदी करण्याकडे ओढ वाढली असून या खेळण्यांमध्येही पालक आता व्हिडिओ गेम्सऐवजी शारिरिक श्रम कसे होतील व चार-पाच मित्र-मैत्रिणींमध्ये कसा खेळ खेळला जाईल याकडे लक्ष देत मुलांना तशी खेळणी खरेदी करुन देत आहेत.


करतील असे गेम्स खरेदी करण्यास आता पालक प्राधान्य देत आहे. बच्चेकंपनीची हीच मागणी असल्याने पालकांना पझलबॉक्सऐवजी इलेक्ट्रॉनिक गिटार, रिमोट कार्स, स्वत: घरात चालवावयाच्या कार्स वा मिनी क्रिकेटचे साहित्यही खरेदी करावे लागत आहे. मुलीदेखील आता बाहुल्यांबरोबर गेम्स खेळण्यास पसंती द्यायला लागल्या आहेत.


सुटीमध्ये अनेकजण एका ठिकाणी जमून खेळत असल्याने त्यांना तशाच प्रकारचे गेम्स हवे असतात. त्यामुळे त्यातही भरपूर खेळून थकतील व शारिरिक विकास कसा होईल तसेच उन्हापासून कसा बचाव करुन मुलांना आपले मनोरंजन करता येईल यावर पालक भर देत आहेत. त्यामुळे घरातल्या घरात खेळता येईल असे बास्केट बॉलसारखे खेळ दुकानांमध्ये उपलब्ध झाले आहेत. तसेच सायंकाळी अंगणात वा व्हरांड्यात वा कॉलनी परिसरात खेळण्यासाठी बॅडमिंटनलाही मागणी वाढलेली आहे. व्हिडिओ गेम्स खेळण्यापेक्षा असे खेळ मुलांनी खेळावेत याकरता पालक प्रयत्न करीत आहेत.


स्वरूप बदलतो
मुलांना सुटीमध्ये मनोरंजन करणारे गेम्स हवे असतात त्यामुळे आम्ही गेम्सचे स्वरुप बदलतो. तसेच श्रम होतील असे खेळ घरातही खेळता येतील अशा प्रकारचे गेम्सचे कीट्सच आम्ही ठेवत आहोत. प्राजक्ता जोशी, संचालिका, किडविझ लायब्ररी