आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

विनापरवानगी वर्गणी घेतल्यास गणेश मंडळांना दहा हजारांचा दंड

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक- सार्वजनिक उत्सव साजरा करताना नागरिकांकडून धर्मादाय आयुक्तांच्या परवानगीविना किंवा सक्तीने वर्गणी घेतल्यास अशा सार्वजनिक मंडळांना कलम 67 प्रमाणे सुमारे दहा हजाराचा दंड होऊ शकतो. त्यामुळे सार्वजनिक मंडळांनी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी आवश्यक गोष्टींची तसेच कागदपत्रांची पूर्तता करून नोंदणी करावी, असे आवाहन धर्मादाय आयुक्तालयाकडून करण्यात आले आहे.

गणपतीचे आगमन काही दिवसांवर आल्याने ठिकठिकाणी मंडप उभारणी तसेच वेगवेगळ्या प्रकारच्या कामांची लगबग सुरू झाली आहे. सार्वजनिक मंडळांकडून मोठय़ा प्रमाणात गणेशोत्सव साजरा केला जातो. त्यासाठी मंडळांकडून त्या त्या परिसरातील नागरिकांकडून वर्गणी जमा केली जाते. परंतु, वर्गणी जमा करण्यापूर्वी मंडळांनी धर्मादाय सह आयुक्तांकडून परवानगी घेणे बंधनकारक आहे. विना परवानगी व सक्तीने वर्गणी जमा केल्यास अशा मंडळांवर फौजदारी गुन्हा तसेच दहा हजारांचा दंड होऊ शकतो. त्यामुळे मंडळांनी नोंदणी करून घ्यावी नंतरच वर्गणी जमा करावी व गणपती बसवावे असे आवाहन करण्यात आले आहे.

64 मंडळांची नोंदणी
सार्वजनिक गणेशोत्सव सार्ज‍या करण्यासाठी मंडळांनी नोंदणी करणे आवश्यक असल्याने आतापर्यंत शहर व परिसरातील एकूण 64 मंडळांनी धर्मादाय सह आयुक्तांकडे नोंदणी केली आहे. मागील वर्षी 250 हून अधिक मंडळांनी नोंदणी केली होती.

अशी आहे नियमावली
सक्तीने वर्गणी जमा करू नये, देणगीदारांना पावती पुस्तक द्यावे, वर्गणीचा दुरुपयोग करू नये, खर्चाचा हिशेब ठेवावा, अशा अटी धर्मादाय सह आयुक्तांकडून नोंदणी अर्जात नमूद केल्या आहे.