आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

मैफल - गंधर्व नाट्यसंगीत महोत्सवातून उलगडला बालगंधर्वांचा जीवनप्रवास

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - एखाद्या पारंपरिक नाट्यसंगीताच्या तालमीत ज्याप्रमाणे खुसखुशीत गप्पा आणि विविध नाट्यसंगीत छटांचे सादरीकरण होते, त्या प्रकारची आनंदानुभूती देणा-या वातावरणात ‘सा’निर्मित ‘गंधर्व नाट्यसंगीत महोत्सव’ ही आनंद भाटे व आदित्य ओक यांची मैफल रविवारी रंगली होती. या अनोख्या मैफलीने नाशिककर रसिकांचा रविवार कारणी लागला.
महाकवी कालिदास कलामंदिरात नाशिककरांसाठी प्रथमच गंधर्व नाट्यसंगीत महोत्सव या बालगंधर्वांचा जीवनप्रवास उलगडून दाखविणाºया कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ‘पंचतुंड नररुंड मालघर’ या पारंपरिक नांदीने कार्यक्रमाची सुरुवात झाली. तत्पूर्वी भाटे म्हणाले की, ‘नाट्यसंगीत म्हणजे असे शास्त्रीय संगीत जे सामान्य माणसाला सहज भिडते. त्यातही ते बालगंधर्वांचे असेल तर प्रेक्षकांतील प्रत्येक व्यक्ती त्यांच्या शब्दांशी एकरूप होऊन जाते. नेहमी नव्याने भेटणारे गंधर्व उलगडताना त्यांची सुरावट आपले त्यांच्याशी असलेले नात आणखी घट्ट करते.’
गंधर्वांचे अनेक पैलू सांगताना ‘आनंदे भरीन तिन्ही लोकी, अवघाची संसार सुखाचा करीन’, या राग यमनातील ‘नाथ हा माझा’, पिंपलस रागातील वर्ज सूर लाऊन सादर केलेली ‘स्वकुल तारक सुता’ आणि ‘मम आत्मा गमला’ ही पेशकश सादर केली. संपूर्ण कार्यक्रमामध्ये बालगंधर्वांची आतापर्यंतची सर्वात लोकप्रिय कलाकृती ‘वद जाऊ कुणाला शरण’ हे संगीत सौभद्रमधील गाणे सादर करण्यात आले. उत्तरोत्तर सादर झालेली विविध गाणी, गझल आणि बंदिशींनी कार्यक्रमाची रंगत वाढतच गेली.
कार्यक्रमामध्ये संवादिनीवर आदित्य ओक, टाळ माउली टाकळकर, तर तबल्यावर साई बंकर यांनी साथ संगत केली. संवादिनीबरोबरच पायपेटी या वाद्याची साथ वैशिष्ट्यपूर्ण ठरली.