आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विसर्जनानंतर कुठे विद्रुपता, कुठे स्वच्छता

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिकराेड - महापालिका अाराेग्य विभागाने नाशिकराेडकरांना साेमवारी अाश्चर्याचा धक्का दिला. दसक, चेहडी येथे रात्री स्वच्छता करून घाट चकाचक केला. गणेश विसर्जनाची दसक-पंचक, नांदूर-मानूर, टाकळी, चेहडी, देवळालीगाव, विहितगाव येथे व्यवस्था हाेती. वालदेवी नदीला पाणी नसल्याने गणेशभक्तांचा हिरमाेड झाल्याने त्यांनी दसक चेहडीला पसंती दिली.

घाटावरील भक्तांच्या गर्दीने कुंभमेळ्याची अाठवण झाली. गर्दीत घाटावर घाण, कचरा हाेणार हे गृहीत धरून अाराेग्य विभागाने प्रत्येक घाटावर स्वच्छता निरीक्षकांची नेमणूक केली हाेती. निरीक्षकांनी सफाई कर्मचाऱ्यांकडून रात्री पथदीपांच्या प्रकाशात संपूर्ण घाटाची स्वच्छता करून घाट चकाचक केला.घाटावर जमा केलेल्या मूर्ती सकाळी वाहनातून नेण्यात अाल्या. गाेदावरी, वालदेवी, दारणा येथील घाटासह कृत्रिम तलावाच्या ठिकाणी स्वच्छता निरीक्षक, सफाई कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात अाली हाेती. त्यांनी तेथील कचरा, घाण, निर्माल्य जमा करून परिसर स्वच्छ केला.
घाटावर अग्निशमन दलाचे उपअधिकारी एस. के. बैरागी, फायरमन डी. अार. गाठे, बी. के. कापसे, श्याम काळे पथकासह उपस्थित हाेते. नाशिकराेड उपनगरचे वरिष्ठ निरीक्षक नारायण न्याहाळदे, अशाेक भगत उशिरापर्यंत परिस्थितीवर नियंत्रण ठेवून हाेते.

कुंभपर्वातगर्दीचे नियोजन भाविकांच्या सोयीसाठी प्रशासनाने लाखो रुपये खर्च करून गोदातीरावर प्रशस्त घाटाची निर्मिती केली. याच घाटांचे गणपती विसर्जनानंतर डंपिंग ग्राउंड झाले अाहे. नागरिकांनी स्वच्छतेची जाणीव ठेवली नाहीच, पण ज्यांची घाट स्वच्छतेची जबाबदारी अाहे त्या महापालिका प्रशासनानेही पाठ फिरवल्याने अाताच घाटांची ही स्थिती तर पुढे काय हाेणार, असा प्रश्न निर्माण झाला अाहे.

गणेशमूर्ती विसर्जनासाठी रविवारी (दि. २७) नागरिकांनी कन्नमवार पुलाजवळील लक्ष्मीनारायण घाट, तपोवन परिसरातील घाट, टाळकुटेश्वर परिसरातील घाट या ठिकाणी माेठ्या संख्येने गर्दी केली होती. मात्र, प्रशासनातर्फे या घाटावर मूर्ती संकलित करण्यासाठी कोणत्याही प्रकारची व्यवस्था नसल्याने शेकडो गणेशमूर्ती या घाटावरच पडून होत्या. हीच परिस्थिती निर्माल्यांसाठी हाेती. निर्माल्य गोळा करण्यासाठी कोणत्याही प्रकारची सुविधा नसल्याने ठिकठिकाणी निर्माल्य, थर्माकॉलचे तुकडे, प्लास्टिक पिशव्यांचा खच घाटावर साचला हाेता. यामुळे या भागात प्रचंड अस्वच्छता पसरली असून, दुर्गंधी पसरली हाेती. अशा परिस्थितीमुळे शहराच्या सौंदर्यीकरणात भर घालणाऱ्या घाटाला विद्रूपच स्वरूप प्राप्त झाले होते. अाता तत्काळ घाटांची स्वच्छता केली नाही तर राेगराई पसरण्याची दाट शक्यता अाहे.

घाटांवर शेकडाे मूर्ती
ठिकठिकाणी जरी महापािलकेने मूर्ती संकलन केले असले तरी नवीन घाटांवर तशी व्यवस्था नव्हती. अनेक नागरिकांनी स्वयंप्रेरणेने गणेशमूर्ती नदीपात्रात सोडता घाटावरच ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, गणेश विसर्जनाच्या दिवशी या घाटावर मूर्ती संकलन करण्यासाठी प्रशासनातर्फे कोणत्याही प्रकारची व्यवस्था करण्यात आलेली नव्हती. परिणामी, साेमवारीदेखील या घाटावर शेकडो गणेशमूर्ती तशाच होत्या. याकडे प्रशासनाने लक्ष देऊन मूर्ती जमा करून त्याचे विधिवत विसर्जन करावे, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

सुरक्षा रक्षक नेमावेत
येथीलघाटांवर टवाळखाेरांकडून अनेक गैरप्रकार केले जात असल्याने घाट अातापासूनच टवाळखाेरांचे अड्डे बनले आहेत. हे प्रकार रोखण्यासाठी या ठिकाणी सुरक्षारक्षक नेमण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.

सफाई कर्मचारी गायब
पंचवटीतील घाटांवर मोठ्या प्रमाणावर अस्वच्छता निर्माण झाली असताना, दुसऱ्या दिवशी एकही सफाई कर्मचारी या भागात फिरकला नाही. परिणामी, दिवसभर या ठिकाणी कचरा, निर्माल्य पडून राहिल्याने दुर्गंधी पसरली होती. या घाटाच्या देखभाल स्वच्छतेसाठी कायमस्वरूपी कर्मचारी नेमण्याची गरज यानिमित्ताने पुन्हा अधाेरेखित झाली अाहे.

निरीक्षकांवर जबाबदारी
^नवीन घाटाचे विद्रुपीकरण हाेऊ नये, यामुळे या घाटांच्या स्वच्छतेसाठी संपूर्ण जबाबदारी स्वच्छता निरीक्षकांवर साेपवण्यात अाली हाेती. निरीक्षकांनी विसर्जन साेहळ्यानंतर तत्काळ पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांकडून सर्व घाटांची सफाई करून घाट चकाचक करून घेतले. संजयदराडे, विभागीय स्वच्छता निरीक्षक
अाम्हाला पाठवा छायाचित्र
रविवारीगणेश विसर्जनादरम्यान महापालिकेने निर्माल्य संकलनाची उत्तम व्यवस्था केली. अनेक सामाजिक संघटना-संस्थांनीही गाेदावरी अन्य नद्या प्रदूषित हाेऊ नये, यासाठी प्रबाेधन केले. एवढेच नव्हे तर संकलनात सक्रिय सहभागही घेतला. तरीही अनेक ठिकाणी निर्माल्याचे ढीग साचले. या स्वच्छतेसाठी व्यक्ती, कुटुंबे अन‌् संस्था पुढे अाल्या. अापण किंवा अापल्या संस्थेनेही अशी स्वच्छता केली असेल तर त्याचे छायाचित्र ‘दिव्य मराठी’ला व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून ९८२२११४४३८ या क्रमांकावर पाठवा.