आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुवाधार पावसाने गणरायाचे स्वागत , शुक्रवारी दुपारी एक ते दोन वाजेच्या दरम्यान शहर परिसरात जोरदार हजेरी

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - संपूर्णराज्यभर सक्रिय झालेला मान्सून गेल्या दोन दिवसांपासून नाशिकमध्ये काहीसा शांत झाला होता. मात्र, गणेश प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दुपारी ते वाजेच्या दरम्यान पावसाने जोरदार हजेरी लावली. गणेशमूर्ती प्रतिष्ठापनेचा मुहूर्त दुपारी १.३० वाजेपर्यंतच असल्याने पावसातच बहुतांश भक्तांनी गणेशाची प्रतिष्ठापना केली. प्रारंभीच्या काळात पावसाने अाेढ िदली. परंतु, जुलै अाॅगस्टमध्ये झालेल्या पावसाने जिल्ह्यातील विविध धरणांतील जलसाठ्यातही वाढ झाली तसेच भूजल पातळीही वाढली अाहे.
नाशिक जिल्ह्यात आतापर्यंत नऊ हजार ३४८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून, शुक्रवारी सकाळी वाजेपर्यंतच्या २४ तासात ३५.९ मिलिमीटर पाऊस पडला. शुक्रवारी सकाळी ११ वाजेपासून ते सायंकाळी वाजेपर्यंत २३.९ मिलिमीटर पाऊस पडला. यामध्ये सकाळी ११ ते दुपारी वाजेपर्यंत १५.८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. आतापर्यंत पडलेल्या पावसामध्ये बहुतांश धरणांचे लाभक्षेत्र असलेले इगतपुरी त्र्यंबकेश्वर तालुके आघाडीवर आहेत. इगतपुरीत यंदाच्या २४७७ मिलिमीटर आणि त्र्यंबकेश्वरमध्ये १२११ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. त्यामुळे धरणांच्याही साठ्यात वाढ झाली आहे. गंगापूर धरणात ९१.५ टक्के म्हणजे पाच हजार १५६ दशलक्ष घनफूट पाणी आहे. तर, दारणा धरणात हजार ९१२ दशलक्ष घनफूट पाणी असून, ते ९६.६ टक्के भरले आहे. सद्यस्थितीत दारणातून १४१० क्यूसेक पाण्याचा िवसर्ग सुरू असून, आतापर्यंत त्यातून ३० हजार क्यूसेकपेक्षा अधिक पाणी सोडण्यात आले आहे. तर, नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यात गंगापूर, दारणा, वालदेवी धरणांतून सोडण्यात येणारे तसेच नासर्डी नदीचेही पाणी एकत्रित होत असल्याने आजच्या घडीला नांदूरमध्यमेश्वर बंधाऱ्यातून २४२१ क्यूसेक पाण्याचा िवसर्ग आैरंगाबाद आणि जायकवाडीसाठी सोडण्यात येत आहे