आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Ganesh Festival Decoration Award Distribution Nashik

पुन्हा एकदा बाप्पांचा जयघोष

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - ढोल-ताशांचा गजर व ‘गणपती बाप्पा मोरया’च्या जयघोषात ‘दिव्य मराठी’ व संत गाडगे महाराज पतसंस्थेतर्फे आयोजित गणेशोत्सव आरास स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा बुधवारी दादासाहेब गायकवाड सभागृहात संपन्न झाला.

अभिनेता अंकुश चौधरी, कवी किशोर कदम, विद्या करंजीकर, महापौर अँड. यतिन वाघ, पोलिस उपायुक्त साहेबराव पाटील, सहायक पोलिस आयुक्त गणेश शिंदे, विक्रीकर सहआयुक्त सुमेरकुमार काले, ‘दिव्य मराठी’चे संपादक (महाराष्ट्र) प्रशांत दीक्षित, निवासी संपादक जयप्रकाश पवार यांच्यासह अभिनेता शंतनू गंगणे, निर्माते दामोदर मानकर, लेखक दत्ता पाटील, गायिका मीना परुळकर-निकम, कलादिग्दर्शक अरुण रहाणे आणि वंशवेल चित्रपटातील अन्य कलावंत व्यासपीठावर उपस्थित होते. या वेळी ‘लावण्य मराठमोळ्यांचं’ या कार्यक्रमाला रसिकांनी भरभरून दाद दिली.

सुमेरकुमार काले यांच्या हस्ते ‘दिव्य मराठी’ व ‘मिरजकर ज्वेलर्स’ यांच्यातर्फे आयोजित घरगुती गणेशोत्सव आरास स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली, नंतर ‘दिव्य मराठी’ व गाडगे महाराज पतसंस्थेतर्फे आयोजित गणेशोत्सव आरास स्पर्धेतील सहा विभागांमधील 42 मंडळांना गौरवण्यात आले. विसर्जन मिरवणुकीतील उत्कृष्ट लेझीम पथक, भव्य मूर्ती, सजावट, ढोल पथकासह उत्कृष्ट मिरवणूक, सजावट आदी विशेष बक्षिसे वितरित करण्यात आली. गाडगे महाराज पतसंस्थेचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव बर्वे यांनी स्पर्धेची भूमिका मांडली. पद्माकर लोणकर यांनी प्रास्ताविक, तर स्वप्निल तोरणे यांनी सूत्रसंचालन केले. हेमंत देवरे यांनी आभार मानले.