आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लाडक्या बाप्पांना अाज निराेप, मिरवणूक मार्गावर वाहतुकीत बदल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गेल्या दहा दिवसांपासून घरोघरी चैतन्य मांगल्याची उधळण करणाऱ्या गणरायाला अनंत चतुर्दशीस, अर्थात रविवारी (दि. २७) निरोप देण्यात येणार आहे. विसर्जनासाठी विविध सार्वजनिक मंडळांचे कार्यकर्ते अाणि घराेघरी बाप्पांची प्रतिष्ठापना करणाऱ्या भक्तांसह महापालिका पाेलिस प्रशासन सज्ज झाले अाहे. महापालिकेने शहरात ५८ ठिकाणी गणेश विसर्जनाची व्यवस्था केली अाहे. तसेच, नदीचे प्रदूषण टाळण्यासाठी ठिकठिकाणी कृत्रिम तलाव निर्माण करण्यात अाले अाहेत. अनेक गणेशभक्त शाडू मूर्तींचे घरीच विसर्जन करणार अाहेत. सार्वजनिक विसर्जन मिरवणूक दुपारी वाजेपासून वाकडी बारवपासून निघेल.

मिरवणुकीसाठी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. मिरवणूक मार्गावर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवली जाणार अाहे. मिरवणूक मार्गाची शनिवारी (दि. २६) बीडीडीएस पथकाने तपासणी केली. मिरवणुकीत मंडळांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने मिरवणूक रात्री उशिरापर्यंत सुरू राहील, असा अंदाज पोलिस अधिकाऱ्यांनी वर्तवला. मिरवणूक मार्गावरील वाहतूक दुपारी १२ वाजेपासून मिरवणूक संपेपर्यंत बंद असणार आहे. कुंभमेळा, बकरी ईद, अनंत चतुर्दशी आणि रामकुंड परिसरात स्नानासाठी भाविकांची गर्दी होत असल्याने पोलिसांनी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात ठेवला आहे. सर्व पोलिस कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द करण्यात आल्या आहेत.
शहरातील चाैका-चाैकांमध्ये,रस्ताेरस्ती निनादणार गणरायाचा जयघाेष
सार्वजनिक गणेश विसर्जन मिरवणुकीमुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आला आहे. मिरवणूक मार्गासह शहर आणि परिसरातील वाहतूक वळवण्यात आली आहे. पर्यायी मार्गाचा अवलंब करण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे.

पारंपरिक मिरवणूक मार्ग
वाकडी बारव, चौक मंडई, जहांगीर मशिद, दादासाहेब फाळके रोड, महात्मा फुले मार्केट, बादशाह लॉज कॉर्नर, विजयानंद थिएटर, गाडगे महाराज पुतळा, मेनराेड, धुमाळ पॉइंट, सांगली बँक सिग्नल, महात्मा गांधीरोड, मेहेर सिग्नल, जुना आग्रारोड, अशोकस्तंभ, नवीन तांबट अाळी, रविवार कारंजा, होळकर पूल, मालेगाव स्टँड, पंचवटी कारंजा, मालवीय चौक, परशुराम पुरियारोड, कपालेश्वर मंदिर, भाजीबाजार, म्हसोबा पटांगण.

वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग
पंचवटीएस. टी. अागार, निमाणी बसस्थानक आणि पंचवटी कारंजा येथून सुटणाऱ्या सर्व शहर वाहतूक बस पंचवटी अागारातून सुटणार अाहेत. ओझर, दिंडोरी, पेठ येथून शहरात येणाऱ्या सर्व बस इतर सर्वप्रकारची वाहने आडगाव नाका, कन्नमवार पूल, द्वारका सर्कलकडून नाशिकरोड, नाशिक शहरात इतरत्र जातील. तसेच, पंचवटीकडे जाणारी सर्व वाहने द्वारका सर्कल, कन्नमवार पुलावरून जातील. रविवार कारंजा अशोकस्तंभावरून सुटणाऱ्या सर्व बस शालिमारवरून सुटणार असून, त्याच मार्गाने ये-जा करणार अाहेत.

रामकुंड, म्हसोबा पटांगण, गौरी पटांगण, तपोवन कपिला संगम, नांदूर-मानूर, आडगाव पाझर तलाव, सीता सरोवर, जॉगिंग ट्रॅक रामवाडी, कोणार्कनगर (कृत्रिम तलाव), गोपाळनगर (कृत्रिम तलाव), वाघाडी, (कृत्रिम तलाव), आरटीओ कॉर्नर पेठरोड (कृत्रिम तलाव), गोरक्षनगर, दिंडोरीरोड (कृत्रिम तलाव) राजमाता मंगल कार्यालय वाघाडी नदी (कृत्रिम तलाव)

पश्चिम विभाग
पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी सातपूर विभागीय कार्यालयाच्या वतीने अाठ ठिकाणी कृत्रिम तलाव तयार करण्यात अाले अाहेत. मूर्ती संकलनासाठी १८ डंपरसह ट्रॅक्टर २०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केल्याची माहिती विभागीय अधिकारी महेंद्र पगारे यांनी दिली.

नासर्डी पूल, सातपूर-अंबड लिंकरोड, गंगापूर धबधबा, सोमेश्वर, चांदशी पूल, आनंदवली, मते नर्सरी पूल, सावरकरनगर, पाइपलाइनरोड, रिलायन्स पेट्रोलपंप (कृत्रिम तलाव), विस्डम हायस्कूल रामेश्वरनगर, पाइपलाइनरोड (कृत्रिम तलाव), अशोकनगर पोलिस चौकी (कृत्रिम तलाव), शिवाजीनगर (कृत्रिम तलाव) दसक, पंचक, नांदूर, मानूर, चेहडी, नंदिनी संगम देवळालीगाव वालदेवी घाट; याशिवाय पाच ठिकाणी कृित्रम तलाव. आयटीआय पूल, डे केअर स्कूल, इंदिरानगर, चेतनानगर (कृत्रिम तलाव), गोविंदनगर, जिजाऊ वाचनालय (कृत्रिम तलाव), पिंपळगाव खांब वालदेवी नदी घाट, राजे संभाजी स्टेडियम, अश्विननगर (कृत्रिम तलाव) हिरे विद्यालय (कृत्रिम तलाव)

दीड हजार पाेलिस
विसर्जनासाठी पोलिसांचे नियोजन पूर्ण झाले अाहे. मिरवणुकीवर सीसीटीव्हीद्वारे नजर ठेवली जाणार असून, मिरवणुकीसाठी सुमारे दीड हजार पोलिस कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात राहाणार आहे. कुंभमेळ्याच्या निमित्ताने बंदोबस्तासाठी आलेले ८०० प्रशिक्षणार्थी पोलिस कर्मचारीही बंदोबस्तात सहभागी हाेणार अाहेत.
असा आहे पोलिस बंदोबस्त
परिमंडळ -१ : पोलिसनिरीक्षक- ६, उपनिरीक्षक- १० कर्मचारी ६४० बीएसएफ- एक कंपनी, एसआरपीएफ- दाेन कंपन्या, साध्या कपड्यातील बंदोबस्त. निरीक्षक -२, उपनिरीक्षक- कर्मचारी-
परिमंडळ-: निरीक्षक-उपनिरीक्षक- १० कर्मचारी ६०० बीएसएफ एसआरपीएफची प्रत्येकी एक कंपनी, साध्या कपड्यातील बंदोबस्त
एकमुखी दत्त मंदिर, घारपुरे घाट, गोदापार्क जॉगिंग ट्रॅक, चव्हाण कॉलनी ( कृत्रिम तलाव), फॉरेस्ट नर्सरी पूल, गंगापूररोड (कृत्रिम तलाव), दोंदे पूल, उंटवाडी, म्हसोबा मंदिर, नासर्डी पूल, येवलेकर मळा, बॅडमिंटन हॉल (कृत्रिम तलाव), लायन्स क्लब, महापालिका विभागीय कार्यालय, पंडित कॉलनी (कृत्रिम तलाव) कपूरथळा पटांगण, रोकडोबा तालीम, टाळकुटेश्वर मंदिर, रामदास स्वामी मठ, शिवाजीवाडी, रामदास स्वामीनगर बस स्टॉप (कृत्रिम तलाव), साईनाथ चौफुली (कृत्रिम तलाव), किशोरनगर (कृत्रिम तलाव), राणेनगर (कृत्रिम तलाव)