आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गजाननाचे आगमन... प्रफुल्ल झाले तन-मन

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सुमुखश्चैकदन्तश्च कपिलो गजकर्णकः
लम्बोदरश्च विकटो विघ्ननाशो गणाधिपः ।। धूम्रकेतुर्गणाध्यक्षो भालचन्द्रो गजाननः
द्वादशैतानि नामानि यः पठेच्छृणुयादपि ।। विद्यारम्भे विवाहे प्रवेशे निर्गमे तथा
सङ्ग्रामे सङ्कटे चैव विघ्नस्तस्य जायते ।।
नाशिक शहर आणि परिसरात शुक्रवारी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात श्री गणरायाचे आगमन झाले. सर्वांच्याच, विशेषत: मुलांच्या आवडत्या गणरायाला घरी आणण्यासाठी दिवसभर लगबग सुरू होती. कित्येकांनी सहकुटुंब जाऊन गणपतीची मूर्ती आणण्यास पसंती दिली, तर लहानग्यांनी आपल्या सोयीच्या वाद्यांसह वाजतगाजत थाटात गणरायाचे स्वागत केले. शीख आणि मुस्लिम बांधवांनीही प्रतिष्ठापनेसाठी श्रींची मूर्ती शुक्रवारी खरेदी केली. या एकूण सोहळ्यात धो-धो पाऊसही सामील झाला.