आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ना वाहने, ना सुरक्षेची हमी; कारवाईत अडसर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सण,उत्सव म्हटला की भंडारा, महाप्रसादाचे अायाेजन ठरलेलेच. मात्र, काही वेळेस अनवधानाने या महाप्रसादाद्वारे भाविकांना अपाय हाेण्याचीही शक्यता असते. बनविण्याची पद्धत वा खाण्यायाेग्य नसलेल्या पदार्थांचा वापर, साठवणुकीवेळी दुर्लक्ष अादी कारणांमुळे दुर्घटनेची शक्यता असते. याचमुळे शासनाने अाता अशा माेठ्या प्रमाणावरील महाप्रसाद वा भंडाऱ्यांवर नजर ठेवण्याचे, तपासणी करण्याचे अादेश अन्न अाैषध प्रशासनाला दिले अाहेत. तशा सूचनाही देण्यात अाल्या अाहेत. त्यानुसार नाशिक अन्न अाैषध प्रशासनाने चार पथके त्यात दहा कर्मचाऱ्यांची नेमणूक केली अाहे. मात्र, जिल्ह्यातील शेकडाे गणेश मंडळांवर नजर ठेवण्यासाठी हे प्रयत्न अगदी ताेकडे असल्याचे सांगण्याची गरज नाही.
सार्वजनिक गणेश मंडळ, तसेच पदाधिकाऱ्यांना सूचना देण्यासाठी अन्न औषध प्रशासनाने जनजागृतीपर नाेटिसा तयार केल्या अाहेत खऱ्या. मात्र, त्यांद्वारे खराेखरच प्रबाेधन हाेईल का याबाबतही शंकाच अाहे. अगाेदरच मंत्र्यांचे दाैरे, सुरक्षेची हमी, हाॅटेल, मिठाई दुकानदारांची तपासणी, अपुरे मनुष्यबळ अादी कारणांमुळे प्रशासनाच्या नाकीनऊ अाले अाहे. अाता या वाढत्या जबाबदारीमुळे अधिकाऱ्यांपुढे अाव्हान उभे ठाकले असून, अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अपुऱ्या यंत्रणेमुळे ते ही जबाबदारी कशाप्रकारे पार पाडतील याबाबत शंकाच अाहे.

जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अन्न भेसळ रोखण्यासाठी, गुटखा विक्री, बनावट मावाची विक्री आदीवर नियंत्रण, कारवाई करण्याची जबाबदारी अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांना करावी लागते. मात्र अधिकाऱ्यंाकडे कारवाई करण्यासाठी स्वत:च्या विभागाचे वाहनही उपलब्ध नाही. तसेच कोणत्याही ठिकाणी कारवाई करण्यासाठी गेले असता त्या ठिकाणी अधिकाऱ्यांना सुरक्षेसंदर्भात कोणत्याही प्रकारची हमी नसते. यापूर्वी अशीच तपासणी करताना दोन अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांवर हल्ला झाल्याच्या घटना घडलेल्या हाेत्या. मात्र हल्लेखोरांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर पुढे काहीच कारवाई झाली नाही.

..तर तातडीने साधावा संपर्क
मिठाई खरेदी करताना वा खाताना कोणत्याही प्रकारची शंका आल्यास सहआयुक्य-नाशिक विभाग, अन्न औषध प्रशासन यांच्याशी दूरध्वनी क्रमांक (०२५३) २३५१२०४ २३५१२०० या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे अावाहन प्रशासनाने केले अाहे.

जबाबदारी पार पाडणार तरी कशी?
विशेष म्हणजे, पथकातील अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांना कार्यालयीन कामकाज, प्राप्त झालेल्या तक्रारींच्या नमुन्यांसंदर्भातील कामे, न्यायालयीन प्रकरणे, शासनाकडून प्राप्त झालेली विविध मार्गदर्शने, मंत्रीमहाेदयांचे दाैरे आदी महत्त्वाची कामेही पार पाडावी लागत असल्याने त्यांच्या चांगलेच नाकीनऊ येणार यात शंका नाही. त्यामुळे ही महत्त्वाची जबाबदारी ते कशाप्रकारे पार पाडतील, याचा विचार शासनस्तरावरून तातडीने हाेणे गरजेचे अाहे.

संवेदनशील विभाग तरी मनुष्यबळाचा अभावच
मानवी सुरक्षितेच्या दृष्टीने अन्न सुरक्षा विभाग अत्यंत संवेदनशील विभाग आहेत. थेट खाद्यपदार्थासंदर्भातील वस्तूच्या दर्जा तपासणीबाबतचे कामे अन्न औषध विभागाकडून केली जाते. अशी परिस्थिती असताना जिल्ह्याचा कारभार फक्त अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांच्या खांद्यावरच भिस्त आहे. नाशिक विभागात १० अन्नसुरक्षा अधिकारी दोन सहायक आयुक्तांच्या जागा रिक्त आहेत. परिणामी अन्न औषध विभागाच्या कामकाजावर त्याचा परिणाम होत आहे. या विभागाच्या रिक्त जागा भरण्याबाबत अनेकदा शासनदरबारी पाठपुरावा होऊनही अद्याप त्याबाबत निर्णय घेण्यात आलेला नाही.

प्रशासनाने परिपत्रकाद्वारे दिलेल्या सूचना...
{ मिठाईची खरेदी करताना ती ताजी आहे का याची खात्री करूनच किमान आवश्यकतेनुसार मिठाई घ्यावी.
{ परवानाधारक अथवा नोंदणीधारक मिठाई विक्रेत्यांकडूनच मिठाई खरेदी करावी. बिलाशिवाय मिठाई खरेदी करू नये.
{उघड्यावरील मिठाई खरेदी करू नये.
{माव्यापासून तयार मिठाईचे सेवन २४ तासांच्या आत करावे.
{ बंगाली तत्सम मिठाईचे सेवन शक्यतो खरेदी केल्यापासून ते १० तासांच्या आत करावे.
{मिठाईवर बुरशी आढळून आल्यास सेवन करता नष्ट करावी.
{ मिठाई खराब असल्याची शंका अाल्यास अथवा चवीत फरक जाणवला तर सेवन करता मिठाई त्वरित नष्ट करावी.

मिठाईविक्रेत्यांना प्रशासनाच्या विशेष सूचना
विषबाधा, बनावट माव्याची विक्री होता कामा नये, यासाठी अन्न औषध प्रशासन विभागाच्या वतीने शहरातील मिठाईविक्रेत्यांची बैठक घेण्यात आली होती. त्यांना यासंदर्भात माहिती सूचना देण्यात आल्याचे विभागाच्या अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. गणेशाेत्सवात येणाऱ्या भाविकांची संख्या माेठी असल्याने कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी यावेळी विक्रेत्यांना खबरदारीच्या सूचना देण्यात अाल्या.

हतबल प्रशासनाचे मंडळांना अावाहन...
सार्वजनिक गणेश मंडळांसाठी अन्न अाैषध प्रशासनाकडून परिपत्रकाद्वारे अशाप्रकारे सूचना देण्यात येत अाहेत. मात्र प्रत्यक्ष पाहणी, प्रबाेधनाला बगल देत केवळ नाेटिसांद्वारे जबाबदारी पार पाडण्यापलीकडे प्रशासनाकडे दुसरा सक्षम पर्यायच नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत अाहे.

अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या खांद्यावर अाेझे...
संपूर्ण जिल्ह्यातील छोट्या-मोठ्या नोंदणीकृत मंडळांची संख्या सातशेहून अधिक असताना त्यासाठी अन्न औषध प्रशासनाचे पाच अन्नसुरक्षा अधिकारी, महापालिका क्षेत्रातील तीन अन्नसुरक्षा अधिकारी मालेगाव येथील दोन अन्नसुरक्षा अधिकारी अशा एकूण दहा अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात अाली अाहे. त्यांच्यावर भंडारा, महाप्रसादावर नजर ठेवण्याची जबाबदारी साेपविण्यात अाली अाहे.
थेट प्रश्न
अपुरे मनुष्यबळ, व्हीआयपी दौरे, सुरक्षेची हमी या कारणांमुळे तपासणीची जबाबदारी पार पाडण्यात अनेक अडथळे
{प्रत्यक्ष भेट, पाहणी, प्रबाेधन, तपासणीबाबत प्रश्नचिन्हच
{खबरदारी घेण्याचे केवळ अावाहनच
सार्वजनिक गणेशोत्सवात मंडळांकडून भंडारा, तसेच महाप्रसादाचे अायाेजन केले जाते. माेठ्या मंडळांकडून प्रामुख्याने याचे अायाेजन हाेते. मात्र, अशा महाप्रसादातून कुठल्याही प्रकारचे खाण्यायाेग्य नसलेले वा शरीरास हानिकारक पदार्थ भाविकांना वाटप हाेऊ नये, यासाठी अन्न औषध विभागाकडून तपासणीसाठी विशेष पथकांची नेमणूक करण्यात अाली आहे. संपूर्ण जिल्ह्यासाठी चार पथकांच्या माध्यमातून १० कर्मचारी जिल्हाभरातील शेकडो गणेश मंडळांपर्यंत जाऊन त्या ठिकाणी तपासणी, जनजागृती करणार असल्याचे सांगण्यात येते. मात्र, या शेकडाे मंडळांपर्यंत या अधिकाऱ्यांना पाेहाेचणे शक्य हाेईल का, असा प्रश्न उपस्थित हाेत अाहे. अाधीच अपुऱ्या मनुष्यबळाचे रडगाणे गाणाऱ्या प्रशासनाला अाता या नवीन जबाबदारीमुळे पेच पडला अाहे. त्यावर ‘डी. बी. स्टार’ने टाकलेला हा प्रकाशझोत...
उदय वंजारी, सहआयुक्त,अन्न औषध विभाग
{ सण-उत्सवाच्या काळात सुरक्षेच्या दृष्टीने विभागाच्या वतीने काय उपाययोजना करण्यात आल्या आहेत?
-गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर तपासणीसाठी स्वतंत्र पथकांची नेमणूक करण्यात आली आहे.
{गणेशोत्सवासाठी सार्वजनिक मंडळाना काय सूचना देण्यात आल्या आहेत?
-जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळे तसेच मिठाईविक्रेते यांना परिपत्रकांद्वारे सूचना करण्यात आलेल्या आहेत.
{अन्न औषध विभागाकडे मनुष्यबळाचा अभाव अाहे. यंत्रणाही पुरेशा नाहीत, मग ही महत्त्वपूर्ण जबाबदारी कशी यशस्वीपणे पार पाडाल?
-हाेय, विभागाकडे अन्नसुरक्षा अधिकाऱ्यांची पदे रिक्त आहे. याबाबतची माहिती वरिष्ठांकडे पाठविण्यात आली आहे. मात्र, उपलब्ध मनुष्यबळाच्या अाधारे नियमित कारवाई, तपासणीची कामे केली जात अाहेत.
बातम्या आणखी आहेत...