आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मूर्ती विक्रेत्यांच्या दादागिरी समोर पोलिस व पालिकेने टेकले हात

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - त्र्यंबकरोडवरील जागेवर गणेश मूर्ती विक्रेत्यांसाठी उभारलेले गाळे अनधिकृत असल्यने ते हटविण्याचे आदेश महापौर अॅड. यतिन वाघ यांनी देऊनही बुधवारी सायंकाळपर्यंत तशी कारवाई झाली नाही. याउलट पोलिस व पालिकेला आव्हान देत विक्रेत्यांनी गाळे न काढता तेथे मूर्ती विक्रीसाठी आणून ठेवल्या. यामुळे पालिका व पोलिसांनी विक्रेत्यांच्या दादागिरीपुढे हात टेकल्याचेच चित्र दिसले.

सायंकाळी ईदगाह मैदानाची जागा विक्रेत्यांसाठी देण्यास पोलिस आयुक्तालयाने ना हरकत दाखला दिला त्यानंतर प्रशासनाने विक्रेत्यांना त्र्यंबकरोडवरील गाळे काढून स्थलांतर करण्याचे आवाहन करण्यात येत होते. गाळे उभारणीच्या मुद्यावरून अडचणीत आलेल्या महापाैर अॅड. यतिन वाघ यांनी ६ ऑगस्ट रोजी ईदगाह मैदानासह शहरातील ४२ जागांवर गाळे उभारणीसाठी पोलिसांना पाठवलेल्या पत्राचा संदर्भ देत दोनच िठकाणी परवानगी िमळाल्याचा दावा केला होता. तसेच त्र्यंबकरोडवरील अनधिकृत गाळे हटविण्याचे आदेश दिले. बुधवारी पोलिस आयुक्तालयाने ईदगाह मैदानासह ४२ ठिकाणी गाळे उभारणीसाठी परवानगी दिल्याचे पत्र पाठविल्याचे उपायुक्त गोतीसे यांनी सांगितले.
सरकारी यंत्रणांची संशयास्पद भूमिका
यापूर्वी एकमेकांवर खापर फाेडून त्र्यंबकरोड विक्रेत्यांना अतिक्रमणासाठी आंदण देणाऱ्या पोलिस व पालिका प्रशासनाचे िपतळ उघडे पडले आहे. पालिकेची जागा आहे त्यामुळे त्यांनी अर्ज केला तर अतिक्रमण काढून घेऊ, असे उपायुक्त संदीप दिवाण यांनी स्पष्ट केले होते. मंगळवारी महापाैरांनी त्र्यंबकरोडवरील अतिक्रमण काढून घेण्यासाठी गुन्हे दाखल करण्यापर्यंत कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार सरकारवाडा पोलिस ठाण्यात तक्रार अर्जही दाखल झाल्याने प्रत्यक्षात बुधवारी विक्रेत्यांनी गाळ्यांना अधिक बळकट केले. गाळ्यांविरोधात कारवाईसाठी पालिका व पोलिस दोघेही राजी असताना मग कारवाई का होत नाही, असा सवाल आता सामान्यांना पडला आहे.

..तर संयुक्त मोहीम
त्र्यंबकरोडवरील गाळे अनधिकृत असून, विक्रेत्यांनी ईदगाह मैदानावर गाळे स्थलांतरित न केल्यास संबंधिताविरोधात कारवाई केली जाईल. प्रत्येक विक्रेत्याला त्याबाबत कर्मचाऱ्यांनी सायंकाळी अवगत केले. त्यानंतरही कारवाई न झाल्यास पोलिसांबरोबर संयुक्त मोहीम घेतली जाईल.
दत्तात्रय गाेतीसे, उपायुक्त मनपा
महापाैरांची चुप्पी
राजकीय दबावात असलेल्या महापाैरांनी बुधवारी अतिक्रमण काढून घेण्याबाबत बाेलणे टाळले. मंडप ठेकेदारावर गुन्हा दाखल नाही. दुसरीकडे विक्रेते गाळे उभारणी करताय, असे वचिारल्यावर त्यांनी माहिती घेऊन सांिगतले. पोलिसांनी पाठवलेल्या पत्राविषयी अनभिज्ञ असल्याचे त्यांनी सांिगतले. एकूणच या प्रकरणात विधानसभा िनवडणूकीच्या तोंडावर राजकारणही तापल्याचे चित्र आहे.