आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तयारी निर्विघ्न गणेशोत्सवाची; बॉम्बशोध पथकाकडून पाहणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष उपाययोजना राबविल्या जाणार असून, त्या अंतर्गत रेल्वेस्थानकावर गुन्हेगार व संशयितांवर लक्ष ठेवण्यासाठी स्वतंत्र यंत्रणा तैनात करण्यात आली आहे. तसेच नाशिकरोड, उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील संवेदनशील ठिकाणी बंदोबस्ताचे नियोजन करण्यात आले आहे.

राज्यासह देशभरातून येणार्‍या गाड्यांची तपासणी करतानाच प्रवाशांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येते आहे. तिन्ही प्लॅटफॉर्मवर गस्तीपथके तैनात करण्यात आली असून, प्रवेश व बाहेर पडण्याच्या मार्गासह आरक्षण, तिकीट केंद्रांच्या ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आला आहे.

संशयित, अनोळखी व्यक्तींची माहिती द्यावी, बेवारस वस्तूंना हात लावू, याबाबत प्रवाशांना आवाहन केले जाते आहे. नाशिकरोड, उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीत यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत लहान-मोठय़ा मंडळांची संख्या कमी असली तरी गणेशभक्तांची होणारी गर्दी लक्षात घेऊन संवेदनशील, अतिसंवेदनशील ठिकाणे, शहरातील महत्त्वाच्या चौकाचौकांत पोलिस बंदोबस्त, गस्ती पथके तैनात करण्यात आली आहेत.

याशिवाय, मुख्य रस्त्यांवर बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत. पोलिसांकडून गणेश मंडळांना बेवारस वस्तू व संशयितांची माहिती देण्याचे आवाहन बैठकांद्वारे केले जाते आहे.

बॉम्बशोध पथकाकडून झाली पाहणी ; श्वान पथकही झाले सज्जगणेशोत्सव काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी बॉम्बशोध पथक सक्रिय झाले असून, या पथकाने शहरातील सार्वजनिक ठिकाणी श्वान पथकासह पाहणी केली. या वेळी नागरिकांना सतर्क राहाण्याचे आवाहन पोलिसांनी केले.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था कायम राहावी, यासाठी पोलिस प्रशासनाकडून खबरदारीचे विविध उपाय हाती घेण्यात आले आहेत. या उपाययोजनांतर्गत शनिवारी बॉम्बशोध पथकाने शहराच्या सार्वजनिक ठिकाणांसह विविध भागात श्वानपथक आणि बॉम्बनाशक पथकासह पाहणी केली. सणासुदीच्या कालावधीत बेवारस वस्तू आढळल्यास पोलिसांना कळवावे, असे आवाहनही करण्यात आले.