आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गणेश विसर्जनासाठी ४१ कृत्रिम तलाव, मूर्तिदान करण्याचे पालिकेचे भाविकांना आवाहन

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- गणेश विसर्जनासाठी शहरात महापालिकेने ४१ कृत्रिम तलावांची निर्मिती केली असून, गोदावरीचे प्रदूषण टाळण्यासाठी भाविकांना मूर्तिदान करण्याचे आवाहन पालिकेने केले आहे.
विभागनिहाय कृत्रिम तलाव राहणार असून. त्या-त्या ठिकाणी पालिकेचे कर्मचारी सामाजिक संघटनांच्या मदतीने मूर्ती संकलन करणार आहेत. निर्माल्य संकलनाची जबाबदारीही पालिका घेणार आहे. कृत्रिम तलावांची ठिकाणे पुढीलप्रमाणे- रामदास स्वामीनगर, साईनाथ चौक (इंदिरानगर), किशोरनगर (राणेनगर), पश्चिम विभागात श्री एकमुखी दत्तामंदिराजवळ, घारपुरे घाट, हनुमान घाट (अशोक स्तंभ), चोपडा लॉन्स पूल, चव्हाण कॉलनी (परीचा बाग), फॉरेस्ट नर्सरी पूल, येवलेकर मळा, दोंदे पूल, शिवसत्य कला, क्रीडा मंडळ मैदान, महात्मानगर जलकुंभाजवळ, नवीन पंडित कॉलनी, गायकवाडनगर शाळेजवळ, पंचवटी विभाग सीतासरोवर (म्हसरूळ), राजमाता मंगल कार्यालयाशेजारी (वाघाडी नदी), दत्त चौक, रामवाडी चिंचबन, तपोवन कपिला संगम, रामकुंड, लक्ष्मण कुंड, म्हसोबा पटांगण, टाळकुटेश्वर मंदिर, आरटीओ कार्यालय, कोणार्कनगर आडगाव, सातपूर विभागामध्ये अंबड लिंकरोड, आनंदवली गाव, सोमेश्वर मंदिर, गंगापूर धबधबा, आसारामबापू पूल आणि नाशिकरोड विभागामध्ये देवळालीगाव, चेहेडी, वडनेरगाव, विहितगाव, शिखरेवाडी, नारायण बापू चौक, चेहेडी क्रीडांगण, निसर्ग उपचार केंद्र, जयभवानीरोड, नाशिकरोड.