आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विसर्जन मिरवणूक, बड्यांच्या, ३७ मंडळांवर ध्वनिप्रदूषणाचे गुन्हे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गणेश विसर्जन मिरवणुकीत ध्वनिप्रदूषण करणाऱ्या राजकीय बडे पदाधिकारी असलेल्या भाऊ, नानांच्या मंडळांसह ३७ गणेश मंडळांवर ध्वनिप्रदूषणाचे गुन्हे दाखल करण्यात आले. ध्वनिप्रदूषणाचे सर्वाधिक गुन्हे परिमंडळ मधील विभाग मध्ये दाखल करण्यात आले. राजकीय पक्षांच्या मंडळासह डीजेचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आल्याने राजकीय पक्षांसह डीजेचालकांचे धाबे दणाणले. इको फ्रेंडली पारंपरिक वाद्यांच्या गजरात विसर्जन करण्यासाठी पोलिस आयुक्त डॉ. रवींद्रकुमार सिंघल यांनी आवाहन केले होते. या आवाहनाला अनेक मंडळांनी प्रतिसाद दिला.
शहरात सर्वत्र गणेश विसर्जन शांततेत पार पडले. मात्र, विसर्जन मिरवणुकीत मंडळांनी ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन केल्याने राजकीय नेते संस्थापक असलेल्या गणेश मंडळांसह इतर ३७ मंडळांवर ध्वनिप्रदूषण केल्याप्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले. डीजेचा आवाज सामान्य ६५ डेसिबलपेक्षाही अधिक ठेवल्याचे नॉइज मीटर मापक यंत्राद्वारे निदर्शनास आले. सर्वाधिक गुन्हे परिमंडळ च्या विभाग मधील भद्रकाली आणि गंगापूर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आले. यासह विभाग मधील पंचवटी, आडगाव, म्हसरुळ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले. परिमंडळ मधील विभाग मध्ये गुन्हे दाखल करण्यात आले. सहायक आयुक्त डॉ. राजू भुजबळ, विजयकुमार चव्हाण, अतुल झेंडे, मोहन ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली १३ पोलिस ठाण्यांच्या वरिष्ठ निरीक्षकांनी ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मंडळांवर कारवाई केली.
यामंडळांवर झाले गुन्हे दाखल : रोकडोबामित्रमंडळ, शिवसेवा मित्रमंडळ, दंडे हनुमान मित्रमंडळ, मुंबईनाका युवक मित्रमंडळ, दुर्गा फ्रेंण्ड सर्कल, बंडू वस्ताद तालीम संघ, कैलास मित्रमंडळ, अंबिका चौक मंडळ या राजकीय नेत्यांच्या मंडळांसह शहर परिसरात ३७ मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आले.

नाशिकराेडला दोन गुन्हा : नाशिकरोडयेथील दोन मंडळांवर ध्वनिप्रदूषण केल्याचा गुन्हा उपनगर पोलिसांनी दाखल केला अाहे. उपनगर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयभवानी मार्गावरील भालेराव मळा येथील सिद्धिविनायक गणेश मित्र मंडळ यांनी गुरुवारी रात्री वाजेच्या सुमारास निवासी क्षेत्रामध्ये मर्यादेपेक्षाही अधिक ध्वनिक्षेपण केल्याने मंडळाचे अध्यक्ष मंगेश भास्कर साळवे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तर, जाचक मळ्यातील जयभवानी मंडळाचे अध्यक्ष किरण गायकवाड यांनी ध्वनिक्षेपणाचा कायदा मोडल्याने त्यांच्यावरही उपनगर पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खटला दाखल करणार
^सुप्रीमकोर्टाच्या आदेशानुसार ध्वनिक्षेपकाच्या आवाजाचे उल्लंघन करणाऱ्या मंडळावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी न्यायालयात खटला पाठवण्यात येणार आहे. यामध्ये दंडात्मक कारवाईसह शिक्षेची तरतूद आहे. -डॉ. राजू भुजबळ, सहायक, आयुक्त विभाग


विसर्जन मिरवणूक दाखल गुन्ह्यांचे आकडे
विभाग : पंचवटी- ४, आडगाव - २, म्हसरूळ -
विभाग: भद्रकाली- ८, मुंबई नाका - ३, सरकारवाडा - ५, गंगापूर -
विभाग: अंबड- ३, सातपूर - १, इंदिरानगर -
विभाग: नाशिकरोड- ०, उपनगर - २, देवळाली कॅम्प
बातम्या आणखी आहेत...