आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विसर्जन मिरवणूक मार्गावर अाज सकाळी 10 वाजेपासूनच प्रवेश बंद, पूर्ण वेळ मजा लुटता येणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गणेश विसर्जन मिरवणूक यंदा सकाळी ११ वाजता निघणार असल्याने मंगळवारी (दि. ५) मिरवणूक मार्गावरील वाहतूक सकाळी १० वाजेपासून मिरवणूक संंपेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद राहणार आहे. विसर्जन मिरवणूक असल्याने वाहतूक मार्गात बदल करण्यात अाला अाहे. 
 
वाकडीबारव, चौक मंडई, जहांगीर मशीद, दादासादेब फाळकेरोड, महात्मा फुले मार्केट, बादशाह कॉर्नर, विजयानंद थिएटर, संत गाडगे महाराज पुतळा, गो. ह. देशपांडे पथ, धुमाळ पॉइंट, सांगली बँक सिग्नल, महात्मा गांधीरोड, मेहर सिग्नल, जुना आग्रारोड, अशोकस्तंभ, तांबट अाळी, रविवार कारंजा, होळकर पुल, मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी कारंजा, मालवीय चौक, परशरामपुरिया रोड, कपालेश्वर, भाजी बाजार, म्हसोबा पटांगण, विसर्जन ठिकाण असा मिरवणूक मार्ग आहे. या मार्गावर सर्व प्रकाराच्या वाहनांना प्रवेश बंद असणार आहे. नागरिकांनी बदल केलेल्या मार्गाचा अवलंब करावा असे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे. 
 

या मार्गाचा करा अवलंब 
पंचवटी एसटी डेपो, निमाणी बसस्थानक येथून सुटणाऱ्या बस पंचवटी डेपो येथून सुटतील. ओझर, दिंडोरीरोड, पेठ येथून शहरात येणाऱ्या सर्व बस इतर सर्व प्रकाराची वाहतूक आडगाव नाका, कन्नमवार पूल, पुढे द्वारका सर्कलकडून नाशिकरोड इतरत्र जातील. रविवार कारंजा अशोकस्तंभमार्गे येणाऱ्या बस शालिमार येथून सुटतील त्याचमार्गे ये-जा करतील. 
 
यंदा मिरवणुकीची पूर्ण वेळ मजा लुटणार नाशिककर
उशिरासुरू हाेणाऱ्या गणेशाेत्सव मिरवणुकीमुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाेत असल्याने मंगळवारी (दि. ५) ही मिरवणूक दुपारी १२ वाजताच सुरू करण्याचे नियाेजन करण्यात अाले अाहे. यासाठी ‘दिव्य मराठी’ने पुढाकार घेतला हाेता. महत्त्वाचे म्हणजे महापाैरांनीही त्यानुसार अापले वेळापत्रक अाखले असून यंदा खऱ्या अर्थाने मिरवणुकीची मजा सर्वसामान्य नाशिककरांना पूर्ण वेळ लुटता येईल, असे चित्र अाहे.

बारा दिवस गणेशाेत्सव शांततेत पार पडल्यानंतर पाेलिसांना सर्वाधिक चिंता असते ती विसर्जन मिरवणुकीची. ही मिरवणूक विसर्जन मिरवणूक मार्गावर सायंकाळी 5 च्या सुमारास निघत असल्याने ती उशिरापर्यंत चालतेच; शिवाय अनेक बड्या मंडळांचा विशेषत: काही राजकीय पुढाऱ्यांचा हस्तक्षेप हाेत असल्याने नियाेजन काेलमडते. वाकडी बारवपासून सुरु हाेणाऱ्या या मिरवणुकीच्या अादल्या दिवशीच वाहने लावून अापला क्रमांक नाेंदविण्यात येताे. पहिले पाच मंडळे हे ठरलेले असतात. त्यानंतर मंडळांच्या क्रमांकांत मात्र काही पुढारी दादागिरी करुन घुसखाेरी करतात. प्रामाणिकपणे नंबर लावून उभे असलेले मंडळे त्यामुळे अपसुकच मागे राहतात. ही घुसखाेरी केवळ वाकडी बारव परिसरातच नाही तर मिरवणूक सुरु असतानाही मागून पुढे जाण्यासाठी काही मंडळे प्रयत्न करतात. 

अशा वेळी दाेन मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये वाद निर्माण हाेऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण हाेऊ शकताे. ही बाब लक्षात घेऊन पाेलिस विभागाने यंदा मिरवणुकीच्या वेळेवर लक्ष केंद्रीत करुन दुपारी १२ वाजताच मिरवणूक सुरु करण्याचे नियाेजन केले अाहे. महापाैर रंजना भानसी यांनीही वेळ अलिकडे घेण्यास परवानगी दिली अाहे. याशिवाय काही मंडळांना रात्रीच्या वेळी मध्य नाशिक परिसरातच अापल्या मंडळाची मिरवणूक हवी असते. अशा मंडळांनी मिरवणुकीच्या मागच्या बाजूला राहिल्यास अन्य मंडळांना वेळेत अापल्या गणपतीचे विसर्जन करता येईल असाही पर्याय सुचविला अाहे.  
बातम्या आणखी आहेत...