आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ढोल-ताशांच्या गजरात बाप्पांना निरोप, कार्यकर्ते-ढाेलवादक आणि नागरिकांच्‍या उत्‍साहात मिरवणुक

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ढोल-ताशांसह लेझीम पथकांचा गजर, ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ असा जयघोष अाणि गुलालाची उधळण अशा उत्साहाच्या भक्तिमय वातावरणात लाखाे नाशिककरांनी मंगळवारी, अनंत चतुर्दशीला लाडक्या बाप्पांना निराेप दिला. विशेष म्हणजे, यंदा ‘दिव्य मराठी’च्या पुढाकारामुळे १२.३० वाजताच मिरवणूक सुरू झाल्याने नागरिकांना मनमुराद आनंद लुटता आला. 
 
यंदाच्या गणेशोत्सवात बारा दिवस गणरायाची मनोभावे सेवा केल्यानंतर गणरायाला निरोप देण्यात अाला. दरवर्षी वाजता सुरू होणाऱ्या मिरवणुकीच्या परंपरेला छेद देत ‘दिव्य मराठी’च्या पुढाकारामुळे यंदा प्रथमच वाकडी बारव येथून दुपारी १२ ते १२.३० वाजेच्या सुमारास मुख्य मिरवणुकीला पालकमंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मानाच्या महापालिकेच्या गणपती पूजनाने करण्यात आला. यावेळी महापौर रंजना भानसी, उपमहापौर प्रथमेश गिते, आमदार बाळासाहेब सानप, आमदार सीमा हिरे आदींसह नगरसेवक उपस्थित होते. यानंतर मुख्य मिरवणुकीला सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू असलेल्या ढोल-ताशाच्या गजराने सुरुवात झाली. 
 
ढोलपथकातील तरुणाईने परिधान केलेले फेटे अन् लयबद्ध वादनाचे दृश्य अवघ्या गणेशभक्तांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारे होते. मानाचा चांदीचा गणपती, साक्षी गणपती, नाशिकचा राजावर मिरवणूक मार्गावर ठिकठिकाणी आरती करून पृष्पवृष्टी करण्यात आली. यंदाच्या मिरवणुकीत शहरातील १७ सार्वजनिक गणेश मंडळांनी सहभाग घेतला होता. 
 
वाकडी बारव येथून सुरू झालेली मिरवणूक दूध बाजार, भद्रकाली, मेनरोड, महात्मा गांधीरोड, मेहेर सिग्नल, अशोकस्तंभ, रविवार कारंजा आणि पंचवटीमार्गे नेण्यात आली. रामकुंड येथे या मिरवणुकीचा समारोप करण्यात आला. मिरवणूक मार्गावर दुतर्फा हजाराे नाशिककर या मिरवणुकीचा नजारा पाहण्यासाठी उपस्थित होते. 
 
बातम्या आणखी आहेत...