आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विसर्जनासाठी गेलेल्‍या 14 जणांचा बूडून मृत्‍यू, नाशकात 7 तर, वर्ध्यात 4

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फाइल फोटो. - Divya Marathi
फाइल फोटो.
नाशिक -गणपती बाप्‍पाच्‍या विसर्जनाच्‍या वेळी राज्‍यात 14 जणांचा बूडून मृत्‍यू झाला आहे. नाशिक, वर्धा, पुणे, अमरावती, अकोला आणि नांदेड या ठिकाणी या घटना घडल्‍या आहेत.
- नांदेडमध्‍ये एका भाविकाचा बुडून मृत्‍यू झाला आहे.
- वर्ध्‍यातमध्‍ये 4 जण बुडून मृत्‍यूमुखी पडले आहेत.
- पुण्‍यात एका भक्‍ताचा बुडून मृत्‍यू झाला आहे.
- नाशिक जिल्‍ह्यात सात जण बुडून मृत्‍यूमुखी पडल्‍याची माहिती आहे.
- अमरावती आणि अकोला येथेही एकेका भाविकाचा मृत्‍यू झाला.
वर्धा जिल्‍ह्यात चार जणांचा बुडून मृत्‍यू..
- वर्धा जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील तारसावंगा येथे बूडून चौघांचा मृत्‍यू झाला आहे.
- वर्धा नदीची उपनदी असलेल्या कड नदीच्या पात्रात चौघे बुडाले आहेत.
- वर्ध्यात एकूण पाच तरुण विसर्जनाला गेले होते.
- हंसराज सोमकुवर, पंकज नेहारे व केवल मेश्राम अशी बुडालेल्या तरुणांची नावे आहेत.
बातम्या आणखी आहेत...