आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गणेश विसर्जनदिनी वाहतूक मार्गात बदल

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक- सार्वजनिकगणेश विसर्जन मिरवणुकीच्या दिवशी शहरांतर्गत वाहतूक मार्गात बदल करण्यात आले आहेत. सोमवारी गणेशमूर्ती विसर्जन होणार असल्याने पोलिस आयुक्तांनी काही मार्गात बदल केले आहेत. विसर्जन मिरवणुकीला सोमवारी (दि. ८) पारंपरिक मिरवणूक मार्ग वाकडी बारव चौकमंडई येथून सुरू होईल. जहांगीर मशीद, दादासाहेब फाळके रोड, महात्माफुले मार्केट, बादशाह कॉर्नर, विजयानंद थिएटर, गाडगेमहाराज पुतळा, गो. ह. देशपांडे पथ, सांगली बँक सिग्नल, महात्मा गांधीरोड, मेहेर सिग्नल, स्वामी विवेकानंदरोड (जुना आग्रारोड), अशोकस्तंभ, नवीन तांबट आळी, रविवार कारंजा, होळकर पूल, मालेगाव स्टॅण्ड, पंचवटी कारंजा, मालविय चौक, परशुराम पुरियारोड, कपालेश्वर मंदिर भाजी बाजार मार्गावरून जाणार आहे. म्हसोबा पटांगणावर गणेशमूर्तींचे विसर्जन होईल. दुपारी १२ ते रात्री मिरवणूक संपेपर्यंत सर्व प्रकारच्या वाहनांसाठी हे मार्ग बंद करण्यात आले आहेत. पोलिस, रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या वाहनांना हे निर्बंध लागू नाहीत, अशी अधिसूचना पोलिस आयुक्तांनी जारी केली आहे.