आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शाडूच्या मूर्ती निर्मितीचे प्रशिक्षण.. पीओपीला नाही म्हणा, पर्यावरण सांभाळा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गणेशोत्सवा निमित्त घरात गणेशमूर्तीच्या रूपाने येणारे पावित्र्य पीओपीच्या मूर्तींनी कलुषित होत असून, त्यासंबंधीचा संदेश देण्यासाठी सेवाभावी बहुजन हिताय बहुउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून मोफत शाडूच्या गणेशमूर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात येत आहे.

पीओपीच्या गणेशमूर्ती गोदावरीत विसर्जित केल्यास होणारे प्रदूषण रोखणे हा यामागचा हेतू होता. हुतात्मा स्मारक येथे १६ ऑगस्ट रोजी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात कविता सोनवणे यांनी सर्व वयोगटांतील सहभागींना मूर्तीकलेचे प्रशिक्षण दिले.

विशेष म्हणजे घरचे रंग आणि शाडूची माती एवढेच साहित्य वापरून अतिशय सुबक गणेशमूर्ती तयार करता येतात. यामुळे रासायनिक रंगामुळे होणारा धोकादेखील उद‌्भवत नाही. संस्थेच्या माध्यमातून उपस्थितांना या रंगांमुळे, पीओपीचे दुष्परिणाम देखील समजावून सांगण्यात येत आहे.
शाडूच्या मातीची गणेशमूर्ती पीओपीच्या मूर्तीप्रमाणे सुबक नसते, हा गैरसमज असून, मूर्तीची सुबकता आणि त्या मूर्तीत असणाऱ्या भावना या दोन्ही गोष्टी तपासून पाहिल्यास शाडूची मूर्ती ही श्रेष्ठ ठरते असे या कार्यशाळेत पटवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला. सुमारे ६० लोकांनी यात सहभाग नोंदविला. यात मूर्तींचे विविध प्रकार शिकवले.

कार्यशाळेचे आयोजन राहुल भामरे, विनोद साखला, सौरभ डोंगरे, सागर मटाले, सुरज नेरकर, राहुल दरेकर यांनी केले होते. कार्यशाळेतून प्रदूषणमुक्त नाशिकसाठी काम करण्याचा मानस व्यक्त केला. पीओपीच्या मूर्तींमुळे यंदा नाशिकमध्ये होणारा गणेशोत्सव दूषित होऊ नये म्हणून ही संस्था आणि निगडीत प्रत्येक व्यक्ती सातत्याने काम करणार आहे.