आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्वेलर्सवर दरोड्याच्या तयारीतील टाेळी जेरबंद

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सिडको - ज्वेलर्सच्या दुकानात दरोडा टाकण्याच्या उद्देशाने तयारीत असलेल्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला हत्यारांसह जेरबंद करण्यात अंबड पोलिसांना यश आले. गुरुवारी पहाटे अंबड परिसरात सापळा रचून पकडलेल्या या टोळीकडून देशी बनावटीचा एक कट्टा, जिवंत काडतुसे, दोन कार इतर शस्त्रे हस्तगत करण्यात अाली.अंबडच्या उपनिरीक्षक आश्विनी पाटील गस्त घालत असताना त्यांना साई-विजन या लॉजजवळ एक स्कॉर्पिओ संशयास्पदरीत्या उभी असल्याचे अाढळले. त्यातील दोघांची चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. तपासणी सुरू असताना वाहनांमध्ये हत्यारे सापडली. त्याचवेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देत कर्मचाऱ्यांना बाेलावून घेतले. त्यानंतर लॉजच्या तपासणीचा निर्णय घेण्यात अाला. लाॅजची तपासणी सुरू असताना एका खाेलीतून माेठा अावाज येत असल्याने पाेलिसांनी त्याच खाेलीबाहेर सापळा रचला. सुरुवातीला अातील व्यक्ती खाेलीचा दरवाजा उघडण्यास तयार नव्हती. ‘काेण अाहे,’ अशी विचारणा करत त्यांनी गाेळीबार करण्याचीही धमकी दिली. मात्र, पाेलिसांनी विश्वासात घेऊन दरवाजा उघडताच त्यांना वेळ देता ताब्यात घेतले. आयुक्त एस. जगन्नाथन यांच्या सूचनेनुसार उपायुक्त श्रीकांत धिवरे, सहायक आयुक्त अतुल झेंडे, वरिष्ठ निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्या मार्गदर्शनाखाली या टाेळीचा छडा लावण्यात अाला. उपनिरीक्षक रवींद्र सहारे, समीर वाघ, किरण मतकर यांच्यासह दत्तात्रय पाळदे, अनिल दिघोळे, दत्ता विसे, यादव डंबाळे, रावजी मगर आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

अंतर्गतटोळीयुद्ध पेटण्याची शक्यता : पाेलिसांनीअटक केलेल्यांमध्ये सराईत गुन्हेगार गिरीश अप्पू शेट्टी, अनिरुद्ध धोंडू शिंदे, सुनील हरी काजळे, श्याम नागू पवार, राहुल हरी पिठे, रोशन दीपक पगारे, गणपत रामदास शिंदे यांचा समावेश अाहे. यात शेट्टी, शिंदे यांच्याविरुद्ध खून, दराेडा, लुटमारीसारखे गंभीर गुन्हे दाखल अाहेत. शेट्टी याची गेल्याच महिन्यात माेहन चांगले खून खटल्यातून निर्दोष मुक्तता झाली हाेती. ही टाेळी दरोड्याच्या तयारीत असली तरी सुरुवातीला एकत्रित गुन्हेगारी टाेळीत कार्यरत असलेल्या, पण सध्या दुसऱ्या टाेळीत सक्रिय झालेल्या एका गुन्हेगाराचा खून करण्याचाही त्यांनी कट रचल्याचाही संशय व्यक्त केला जात अाहे.

दरम्यान, अाठवडाभरापूर्वीच चांदवड येथे पाेलिसांनी अशाच प्रकारे एका दराेड्याच्या प्रयत्नातील टाेळी पकडली. त्यातही याच चांगले, पगारे टाेळीतीलच गुन्हेगारांचा समावेश असून, पाेलिसांनी वेळीच मुसक्या अावळल्या, अन्यथा टाेळी युद्ध भडकले असते, असे सांगण्यात येत अाहे. ज्वेलर्सच्या दुकानात दरोडा टाकणाऱ्या टोळीला पकडण्यात अंबड पोलिसांना यश आले. ज्या वाहनात हत्यारे सापडली त्या वाहनाची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक दिनेश बर्डेकर यांच्याकडून घेताना उपायुक्त श्रीकांत धिवरे.

पिस्तूलसह तलवार हस्तगत
या टाेळीकडून कट्टा, चॉपर, कोयता, दोन कटावण्या, छोटी तलवार, देशी बनावटीचा कट्टा, जिवंत काडतुसे आदींसह एक स्कॉर्पिओ (एमएच ३९, सी ४३८६), एक इनोव्हा (एमएच १५, इपी १२८४) राेकड असा सुमारे १७ लाखांचा माल हस्तगत करण्यात अाला अाहे.
बातम्या आणखी आहेत...