आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

गंगापूर धरणाच्या विसर्गात कपात, शुक्रवारी सोडले 5 हजार क्यूसेक पाणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - सतत सुरू असलेल्या पावसामुळे धरणांच्या साठय़ात वाढ होत असून, पातळी समान राखण्यासाठी गंगापूर धरणातून सलग चार दिवसांपासून पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. गुरुवारच्या तुलनेत शुक्रवारी काही अंशी कमी पाऊस झाल्याने विसर्ग 7 हजारवरून 5 हजार क्यूसेकवर आणण्यात आला. दारणातूनही 10 हजार 712 क्यूसेकमध्ये तीन हजार क्यूसेकने कपात करण्यात आली असून 7 हजार 676 क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात आला.

जिल्ह्यात शुक्रवारी 433.4 मिलिमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. त्यात इगतपुरी, दिंडोरी आणि त्र्यंबक या तीन तालुक्यांत 50 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस पडला आहे. नाशिकमध्ये 22.6 मिलिमीटर पाऊस झाला आहे. एकूण सरासरी पर्जन्याच्या दहा टक्के पाऊस 2 ऑगस्टपर्यंत झाल्यामुळे सध्या तरी मागील वर्षीच्या टंचाईच्या पार्श्वभूमीवर समाधानकारक चित्र दिसत आहे.