आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंगापूर धरणामध्ये ६५ टक्के जलसाठा, २२ जुलैपासूनच्या संततधारेने वाढली पातळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - वेळेत आगमन झालेल्या मान्सूनने मध्यंतरी पाठ फिरविल्याने सिंहस्थात पिण्याच्या पाण्यासह गोदाप्रदूषण मुक्तीचाही मोठा प्रश्न निर्माण झाला असताना, २२ जुलैपासून वरुणराजा मेहेरबान झाल्याने गंगापूर धरण तब्बल ६५ टक्के भरले आहे. विशेष म्हणजे, २९ जुलै ते ऑगस्ट म्हणजे अवघ्या दोन दविसांत टक्क्यांनी पाणीपातळीत वाढ होत धरणातील पाणीसाठा ३६५३ दशलक्ष घनफूट इतका झाल्याने ऐन सिंहस्थात नाशिककरांसह भाविकांनाही दिलासा मिळाला आहे.
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरणात मुबलक पाणीसाठा आवश्यक असताना, जून रोजी आगमन झालेल्या मान्सूनने नंतर जवळजवळ महिनाभर दडी मारली होती. यामुळे पिण्याच्या पाण्याचा सिंहस्थाच्या दृष्टीने गोदाप्रदूषण मुक्तीसाठी नदीचा नैसर्गिक प्रवाह कायम ठेवण्यासाठी धरणात आवश्यक पाणीसाठा अनविार्य ठेवण्याचा प्रश्न उभा ठाकला होता. त्यातच न्यायालयानेही सिंहस्थापूर्वीच गोदाप्रदूषणमुक्त करण्याचे आदेश दिले होते. महापालिका आणि जिल्हा प्रशासनाने प्रशासकीय स्तरावरही गोदाप्रदूषणमुक्तीचे नियोजन पावसाच्या भरवश्यावरच केले होते. प्रत्यक्षात अपेक्षेप्रमाणे गंगापूर धरणात पाणीच शिल्लक नसल्याने प्रशासनासमोरील चिंता वाढली होती. मात्र, २२ जुलैपासून वरुणराजा जिल्ह्यावर मेहेरबान झाला. त्यातच इगतपुरी आणि त्र्यंबकेश्वर या धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पावसाने दमदार हजेरी लावल्याने धरणांच्याही साठ्यात वाढ होण्यास सुरुवात झाली आहे.

१८ टक्क्यांवर पाणीसाठा आलेले गंगापूर धरण थेट ६५ टक्के इतके भरले आहे. शविाय, अजूनही पावसाचे ऑगस्ट आणि सप्टेंबर असे दोन महिने शिल्लक असल्याने आणि वेधशाळेनेही पाऊस मुबलक पडणार असल्याचा अंदाज वर्तवला असल्याने आता धरणे भरण्याबाबत कुठलीही चिंता उरली नाही. यामुळे वर्षभर शहरवासीयांना पिण्यासाठी आणि सिंहस्थ कुंभमेळा असल्याने स्नानासाठी नदी प्रवाह कायम राखण्याचा प्रश्नही जवळपास निकाली निघाला आहे.

बातम्या आणखी आहेत...