आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गंगापूर धरणातील पाणीसाठा ६४ टक्क्यांवर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - मागील चार दिवसांत झालेल्या मुसळधार पावसाने जिल्ह्यातील धरणांची स्थिती मोठ्या प्रमाणावर सुधारली असून, आता गंगापूर धरणातील पाणीपातळी ६४.१२ टक्क्यांवर गेले आहे. तर दारणा धरण ६७ टक्के भरले असून, त्यातून १३०० क्यूसेक विसर्ग सुरू असल्यानेच त्याची पातळी टक्क्यांनी घटली आहे. दरम्यान, पावसाने जरा उसंत घेतली असून बुधवारी दुपारनंतर शहरात सूर्यदर्शन झाले.

गंगापूरच्या साठ्यास मंगळवारच्या तुलनेत बुधवारी टक्क्यांनी वाढ होत साठा ६४१२ टक्के झाला आहे. ३६१० दलघनफूट इतके पाणी धरणात असून, दारणातील साठा मात्र टक्क्यांनी कमी झाला आहे. त्यातून १३०० क्युसेक इतका विसर्ग सुरू असल्यानेच तो कमी होत ६७ टक्के म्हणजे ४७८४ दलघनफूट इतका आहे. रविवारपासून धुमाकूळ झालेल्या पावसाने दोन दिवसांपासून उसंत घेतली आहे. शहरात पावसाने बुधवारी दुपारी उघडीप दिली.
बातम्या आणखी आहेत...