आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘गंगापूर’चे पाणी जायकवाडीच्या दिशेने, जलसाठा 2.53 टक्क्यांनी वाढला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक जिल्ह्यातील गंगापूर धरणात 80% (4,514 दलघफू) पाणीसाठा झाल्याने सोमवारी 1600 क्युसेक्सचा विसर्ग गोदापात्रात सोडण्यात आला आहे. रात्री 9 वाजता हे पाणी नाशकात पोहोचले. जायकवाडीच्या नाथसागरात हे पाणी येणार आहे.


धरण समूहात 66% पाणी
गंगापूर धरण समुहातील दारणा,काश्यपी व गौतमी गोदावरी धरणांत एकूण 66 टक्के (6,194 दलघफू) पाणी आहे. गतवर्षी येथे फक्त 15 टक्के पाणी होते.


जायकवाडीत 2.5 टक्के साठा
24 तासांत जायकवाडीत 23.78 दलघमी पाणी आल्यामुळे साठा 2.53 टक्के झाला. 8 दिवसांपासून 20 दलघमी पेक्षा जास्त पाण्याची आवक होत आहे. सध्या धरणात 793 दलघमी, तर उपयुक्त पाणीसाठा 54.98 दलघमी आहे. 29 जुलैपर्यंत 23.78 दलघमी पाणी आले.
गंगापूर : 80%, पालखेड 83, दारणा 72, भावली 99.55, भंडारदरात 77.31 % साठा आहे.