आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मधुरिमा सदस्यांसाठी १५ सप्टेंबरपासून गरबा कार्यशाळा

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - गणेशोत्सव सरला की तयारी सुरु होते नवरात्रोत्सवाची. शक्तीचा आणि भक्तीचा हा उत्सव महिलावर्गात विशेष महत्व असणारा आहे. या उत्सवामध्ये खेळल्या जाणाऱ्या पारंपारिक गरबा नृत्याचे प्रशिक्षण वर्ग ‘दिव्य मराठी मधुरिमा क्लब’ आणि श्रृती जैन गरबा आणि रास यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात अाला अाहे. १५ ते ३० सप्टेंबर या कालावधीत फक्त मधुरिमा सदस्यांसाठी हे वर्ग मोफत आयोजित करण्यात अाले अाहेत.
नाशिकमध्ये सर्व वयोगटांच्या महिलांना खरा गुजराथी गरबा नेमका कसा खेळला जातो याचे शास्त्रोक्त प्रशिक्षण देणाऱ्या ‘श्रृती जैन’ महिलांना प्रशिक्षण देणार आहेत. दिवसांच्या दोन प्रशिक्षण वर्गांचे आयोजन फक्त मधुरिमा सदस्यांसाठी आयोजित करण्यात आले आहे. मोफत प्रशिक्षण वर्गांची वेळ दुपारी ते मध्ये असेल. या वेळात मधुरिमाच्या महिलांना प्रवेश दिले जातील. या वर्गांची प्रवेश क्षमता फक्त ३५ प्रति वर्ग असल्याने प्रथम येणाऱ्यांना प्राधान्य असेल. मधुरिमा सदस्यां व्यतिरिक्त इतरांसाठी सशुल्क प्रशिक्षण वर्ग घेतले जाणार आहेत. त्यामध्ये ११ ते १२, १२ ते १, ते ७, ते आणि खास काम करणाऱ्यांसाठी ऑफिस टाईम व्यतिरिक्तचा ते वाजेचा प्रशिक्षण वर्ग घेतला जाईल.

या वर्गांमध्ये पारंपारिक गुजराथी गरबा, रास शिकवले जातील. शिवाय दोन आंतरराष्टीय दर्जाचे प्रशिक्षक देखील कार्यशाळेला भेट देणार आहेत. ज्यांना अगदीच नाचता येत नाही अशा महिलांनीदेखील काळजी करण्याचे कारण नाही. सुरुवातीपासून अगदी गरबा येईपर्यंत नृत्यप्रकार शिकवले जातील, असे अायाेजकांच्या वतीने सांगण्यात अाले.

अधिक माहितीसाठी मधुरिमा सदस्यांसाठी संपर्क..
मधुरिमासदस्यांना या कार्यशाळेबद्दल अधिक माहितीसाठी ८३९०९०४८३१ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

खरा गरबा पोहोचवण्यासाठी
^बदलत्या काळानुसार नवरात्र आणि गरबा या संकल्पना बदलल्या. मात्र खरा गरबा कसा असतो हे लोक विसरत चालले आहेत. नाशिकच्या लोकांना ख-या नृत्याची ओळख व्हावी यासाठी हे प्रशिक्षण वर्ग घेण्यात येत आहेत. -श्रृती जैन, मुख्य प्रशिक्षिका

नावनोंदणी आणि प्रशिक्षणाचे ठिकाण -
आपल्या नावनोंदणीसाठी ६, श्रीकृष्ण एन्क्लेव्ह, सुझूकी शोरुमच्या वर, हॉटेल सूर जवळ, जेहान सर्कल, गंगापूर रोड येथे दिलेल्या वेळेत हजर रहावे. याच ठिकाणी प्रशिक्षण वर्ग देखील होणार आहेत.

फक्त मधुरिमा सदस्यांसाठी मोफत प्रशिक्षण..
१४ सप्टेंबर रोजी १२ ते या वेळात १५ ते २१ सप्टेंबरच्या मधुरिमा प्रशिक्षण वर्गांची नावनोंदणी होईल. याच दिवशी सायंकाळी ते वेळात २४ ते ३० सप्टेंबरच्या मधुरिमा कार्यशाळेची नावनोंदणी केली जाईल. या प्रशिक्षण वर्गांना फक्त मधुरिमा ओळखपत्र असणा-या महिलांना प्रवेश दिला जाईल. या व्यतिरिक्तच्या वेळांसाठी सशुल्क प्रवेश सुरु रहातील.
बातम्या आणखी आहेत...