आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घंटागाडी कामगार उपाशी; अाराेग्याधिकारी-ठेकेदारांची भाेजनप्रीती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पंधरालाख नाशिककरांच्या अाराेग्याशी निगडित असलेला जवळपास तीनशे काेटी रुपयांचा घंटागाडीचा नवीन ठेका देण्यासाठी प्रक्रिया सुरू असताना सर्वात गंभीर म्हणजे, घंटागाडी कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनावरून सुरू असलेले अांदाेलन त्याचा परिणाम म्हणून कचरा उचलण्याबाबत बहिष्काराचा संघर्ष ताजा असतानाच, महापालिकेचे अाराेग्याधिकारी डाॅ. विजय देकाटे ठेकेदारांची कशी मिलीजुली सुरू ुोअाहे, याचे धक्कादायक चित्रीकरण शहरातील एका हाॅटेलमध्ये झालेल्या प्रीतिभाेजनानिमित्ताने कैद झाले अाहे. एकीकडे ठेकेदार वेळेवर वेतन देत नसल्यामुळे घंटागाडी कर्मचाऱ्यांचे अनेक महिन्यांपासून अांदाेलन सुरू अाहे. तर दुसरीकडे त्यांच्या कामबंद अांदाेलनामुळे शहरभर कचरा साचून नाशिकच्या अाराेग्याचा गंभीर प्रश्न निर्माण हाेणार असताना, अशी नेमकी काेणती गहन चर्चा करण्यात ठेकेदार अाराेग्याधिकारी गुंतले अाहेत, हा प्रश्न अाता संशाेधनाचा विषय बनला अाहे.
महापालिकेचा अाराेग्य विभाग घंटागाडी ठेकेदारांचे लाड पुरवण्यावरून पुरता बदनाम झाला अाहे. मध्यंतरी शासन अादेशानुसार घंटागाडी कर्मचाऱ्यांना किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी मागील फरक देण्याचा मुद्दा असाच गाजला हाेता. अाराेग्य विभागाकडून ठाेस भूमिका घेतली जात नसल्यामुळे कर्मचाऱ्यांनी कामबंद अांदाेलन करून शहराला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यावेळी अाराेग्याधिकाऱ्यांची संशयास्पद भूमिका लक्षात घेत अतिरिक्त अायुक्त जीवन साेनवणे यांनी पुढाकार घेऊन संबंधित सहाही ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्याची धाडसी कारवाई केली. त्यामुळे घंटागाडीच्या पाच वर्षांसाठी सर्वात माेठ्या कंत्राटाच्या स्पर्धेतून हे ठेकेदार बाद झाले. त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शाेधण्याचे काम सुरू असून, तूर्तास ठेकेदारांनी उच्च न्यायालयातही धाव घेतली अाहे. त्यात मध्यस्थी करण्यासाठी महापालिकेत काही उपठेकेदार सक्रिय झाले अाहेत. त्यांच्याकडे घंटागाडीच्या मूळ ठेक्याचा उपठेका देण्यात अाला अाहे. त्यावर ताेडगा म्हणून न्यायालयीन सुनावणीचा अाधार घेऊन ताेपर्यंत ठेकेदारांना सहभागी करून घेण्याबाबतही बराच खल सुरू अाहे. अशातच दाेन ठेकेदार अाराेग्याधिकारी डाॅ. देकाटे यांच्या एका हाॅटेलमध्ये रंगलेल्या पार्टीत नेमकी काेणती खलबते झाली, याबाबतची उत्सुकता वाढली अाहे. महापालिका अायुक्तांनीही अाराेग्याधिकाऱ्यांना नाेटीस बजावून माहिती घेणार असल्याचे म्हटले अाहे.
एेन उन्हाळ्यात डासांनी धुमाकूळ घातलेला अाहे. त्यातच घंटागाडी कर्मचाऱ्यांनी फेब्रुवारीचे वेतन मार्च संपण्याची वेळ अाली तरीही मिळाल्यामुळे साेमवारी घंटागाडीचे कामकाज बंद ठेवले. केवळ पंचवटी विभागातच वेतन झाल्यामुळे येथील घंटागाड्या सुरळीत हाेत्या. प्रारंभीस अाराेग्याधिकारी डाॅ. विजय देकाटे यांच्याकडे विचारणा केली असता त्यांनी सर्व घंटागाड्या सुरू असल्याचे उत्तर प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना दिले. मात्र, सायंकाळी महापालिका प्रवेशद्वारावर घंटागाडी कर्मचाऱ्यांनी अाक्रमक अांदाेलन सुरू केल्यावर त्यांनी कनिष्ठ अधिकाऱ्यांनी अापल्याला चुकीची माहिती दिल्याची सबब सांगत सारवासारव केली. या अांदाेलनातही घंटागाडी कर्मचाऱ्यांनी खाेटी माहिती देणाऱ्या अाराेग्याधिकाऱ्यांचा निषेध केला. दरम्यान, महापालिकेच्या ११७, तर ठेकेदाराच्या ५० अशा १७६ घंटागाड्या असून, त्यापैकी सिडकाेतील १५, पश्चिममधील १२, नाशिकराेडच्या २, नाशिक पूर्व विभागातील ५, तर सातपूर विभागातील सर्वच घंटागाड्या बंद राहिल्या.

सरकारी शिष्टाचाराचाही भंग
देकाटेयांच्यावर डाॅक्टर म्हणून काेठेही काेणाबराेबर जेवणासाठी जाण्याबाबत निर्बंध नाहीत. मात्र, सरकारी अधिकाऱ्यांसाठी असलेल्या सेवाशर्तीनुसार त्यांच्या वर्तणुकीवर अनेक निर्बंधही अाहेत. त्यातच महापालिकेचे अाराेग्याधिकारी म्हणून अाणि विशेष म्हणजे जेव्हा पेस्ट कंट्राेलच्या १९ काेटी रुपयांचे न्यायप्रविष्ट प्रकरण, तसेच घंटागाड्यांचे सुमारे तीनशे काेटींचे कंत्राट देण्याची प्रक्रिया सुरू अाहे, अशावेळी संबंधित ठेकेदारांबराेबर त्यांनी प्रीतिभाेजन करण्यामागचे नेमके कारण काय, असा प्रश्न उपस्थित हाेताे. अशी नेमकी काेणती चर्चा हाेती की जी महापालिकेतील त्यांच्या दालनात झाली नाही. या बैठकीत नेमके काय शिजत हाेते? अनेक दिवसांपासून खदखदणाऱ्या कर्मचारी किमान वेतनाबाबत ठेकेदारांना नेमके काेणते मार्गदर्शन केले जात हाेते, असे असंख्य प्रश्न अाता उपस्थित झाले अाहेत.

स्थायीकडून संशयास्पद काेलांटउडी
सर्वातधक्कादायक म्हणजे, काही महिन्यांपूर्वी घंटागाडी पेस्ट कंट्राेलच्या ठेकेदारांना काळ्या यादीत टाकण्यासाठी प्रचंड अाटापिटा करणाऱ्या स्थायी समिती सदस्यांनी कार्यकाळ संपण्याच्या अखेरच्या सभेत चक्क काळ्या यादीत टाकलेल्या सहाही ठेकेदारांना उच्च न्यायालयात सुनावणी सुरू असल्यामुळे घंटागाडीच्या ठेक्यात सहभागी करून घेण्याचा ठरावही संमत करून दिला अाहे. ताे ठरावही ‘दिव्य मराठी’च्या हाती लागला असून, यात कंत्राट जितके दिवस लांबेल तितकी मुदतवाढही संबंधित ठेकेदारांना देण्यात अाली अाहे. थाेडक्यात वादग्रस्त ठेक्याविराेधात अाराेप करणाऱ्या स्थायीच्या काेलांटउडीमागचा ‘अर्थ’ही चर्चेचा विषय ठरला अाहे.

डाॅ. देकाटेंशी प्रश्नाेत्तरे
खुलासा मागवून कारवाई
^अाराेग्याधिकारी ठेकेदारा समवेतजेवणासाठी का गेले, त्यांच्यातील महत्त्वाची चर्चा काेणती, अशा प्रश्नांची उत्तरे त्यांच्याकडून खुलासा मागवून घेतली जातील. त्यासाठी त्यांना नाेटीस बजावली जाईल. त्यानंतर कारवाई केली जाईल. - डाॅ. प्रवीण गेडाम, अायुक्त

२७ फेब्रुवारी दिन महात्म्य असे...
ज्यादिवशी ठेकेदार अाराेग्याधिकाऱ्यांचे प्रीतिभाेजन झाले ताे दिवस घंटागाडीच्या नवीन ठेक्यासाठी ठेकेदारांच्या बैठकीचा हाेता. त्यात संबंधितांच्या सूचना एेकून प्रशासनाने त्यानुसार बदल करण्यासाठी मुदतवाढ देण्याचाही निर्णय घेतला. यानंतर रात्री दहा वाजता शहरातील एका अालिशान हाॅटेलात असे भाेजन झाले, हाही माेठा याेगायाेगच.
{प्रतिनिधी : घंटागाडी,पेस्ट कंट्राेलच्या ठेकेदारांसमवेत जेवणासाठी गेले हाेतात का?
- डाॅ.देकाटे : हाेय,त्यातील एकाने लग्नाला अाल्यामुळे जेवणासाठी चला, असा अाग्रह धरला हाेता.
{प्रतिनिधी: संबंधितठेकेदाराबराेबर प्राेटाेकाॅलप्रमाणे जाणे याेग्य अाहे का?
- डाॅ.देकाटे : मीमद्य घेतले नाही, साधे जेवण केले. माझ्या मनात काेणतेही पाप नाही.
{प्रतिनिधी: पालिकेच्याकामाशी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष संबंधित व्यक्तींना खासगीत भेटता येते का?
-डाॅ. देकाटे : संबंधितठेकेदाराकडे सध्या काेणतेही काम नाही अाराेग्य विभागाचा ठेकाही नाही.
बातम्या आणखी आहेत...