आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Garden : Bundal Of Politican ; But Garden Suffaring Disease

उद्यान : राजकारणी चिक्कार; उद्यानांना मात्र विकार

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जुने नाशिक - शहरातील अनेक प्रभावी राजकारण्यांचे वास्तव्य असूनही जुन्या नाशिकमधील उद्याने मरगळून गेली आहेत. या भागात आजघडीला दुरवस्था झालेली उद्यानेच जादा असून चांगल्या उद्यानांची वाणवा आहे.

प्रभाग 29 मध्ये कथडा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानातील खेळणी पूर्णपणे तुटली आहे. खेळण्यांची जागा चक्क वाहने लावण्यासाठी वापरली जात आहे. शिंगाडा तलावाजवळील उद्यानाची दुरवस्था झाली. वडाळागाव येथील गणेशनगर उद्यान चार वर्षांपासून बंद पडले आहे. परिणामी, येथील मुलांना इंदिरानगर जॉगिग ट्रॅक येथे खेळण्यासाठी यावे लागते. टाकळीरोड येथील धवलगिरी उद्यान पाणी व देखभालीअभावी कोमेजले आहे. टाकळीरोडच्या प्रभाग 30 मधील शीतल सोसायटी, नागजी हॉस्पिटल, द्वारकावरील जिजामाता, इंदिरानगर जॉगिंग ट्रॅकजवळील ही उद्याने आबालवृद्धांचे आकर्षण ठरले आहे. या उद्यानांत फेरफटका मारण्यासाठी जॉगिंग ट्रॅकची सुविधाही असल्यामुळे ज्येष्ठ नागरिकांसाठीही फायदेशीर ठरले आहे.

कधी होणार खेळण्यांची दुरुस्ती?
खेळण्यासाठी चांगले उद्यान नाही. नागजी हॉस्पिटल उद्यानातील खेळणी चांगली आहे; मात्र इलेक्ट्रॉनिक ट्रेन अनेक दिवसांपासून बंद आहे. नियमित स्वच्छता केली तर उद्याने चकचकीत होतील. फातेमा धडियाल, मारिया दाऊदवाला, विद्यार्थी

देखभालीसाठी देणार
उद्याने देखभालीसाठी बचत गटांकडे देण्यात येतील. पालिकेच्या अखत्यारीतील उद्यानांची सफाई करण्यासाठी कर्मचार्‍यांची नेमणूक केली जाईल. पोपटराव बागुल, विभागीय अधिकारी

तातडीने सुधारणा
उद्यानांचा कायापालट करण्यासाठी प्रथम पाहणी दौरा केला जाईल. खराब उद्यानांची सुधारणा व मोडलेली खेळणीही दुरुस्त केली जातील. वंदना शेवाळे, सभापती, पूर्व विभाग