आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकची उद्याने : झोपाळे झुलेनात; दर्जाचीही ‘घसरगुंडी’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पाच हजार झाडांची काळजी घेतो एकच कर्मचारी; सातपूरच्या मुलांना चांगल्या उद्यानांचा शोध
झोपाळे झुलेनात; दर्जाचीही ‘घसरगुंडी’
प्रतिनिधी । सातपूर
सातपूर विभागात हजारो रुपये खर्च करून तयार केलेल्या घसरगुंड्या तुटल्या आहेत. ‘उंच माझा झोका’ म्हणू पाहणार्‍या मुलांचा झोपाळ्यांचा शोधही संपलेला नाही. सातपूरमध्ये उद्याने तशी 36 असली तरी, त्यातील अपवाद वगळता बहुतांश भकास झाली आहेत. 17 एकरात असलेल्या वसंत कानेटकर उद्यानातील पाच हजार झाडांची काळजी एकच कर्मचारी घेत आहे.

विभागात एकूण 39 एकर परिसरात ही उद्याने असून, देखभाल दुरुस्तीअभावी कोट्यवधी रुपयांचा खर्च डोळ्यांदेखत वाया जात आहे. उद्यानांचे उन्हाळ्यात पाण्यावाचून हाल होत असून, त्याचा फटका सुटीमुळे सकाळ-संध्याकाळ उद्यानात येणार्‍या बालगोपाळांना बसत आहे. अनेक उद्यानांत गाजरगवत वाढलेले दिसते. उद्यानांची काळजी घेतली जात नसल्याची तक्रारही नागरिकांनी केली. विशेष म्हणजे, उद्यानातील खेळण्या धोकादायक झाल्या आहेत.
हे आहे सातपूर परिसरातील आकर्षण

र्शमिकनगरमधील राजमाता जिजाऊ उद्यान, हिंदी शाळेजवळील जगद्गुरू नरेंद्राचार्य उद्यान, महात्मा जोतिबा फु ले उद्यान, महाराणा प्रताप उद्यान, अशोकनगरमधील राज्य कर्मचारी सोसायटी उद्यान, सातपूर कॉलनीतील छत्रपती शिवाजी महाराज उद्यान, गंगापूर येथील जिजामाता उद्यान मुलांच्या आकर्षणाचे केंद्र ठरत आहे. तेथील खेळण्यांची अवस्था चांगली आहे. मात्र, लॉन्स व अन्य सुविधा सुधारण्याची गरज आहे.

प्रभाग सभापती करणार पाहणी

उन्हाळ्याच्या सुटीत मुलांना खेळण्यासाठी चांगली उद्याने नसल्याचा मुद्दा ‘दिव्य मराठी’ने हाती घेतल्यानंतर आता सातपूर प्रभाग सभापती विलास शिंदे यांनी विभागातील सर्व उद्यानांची पाहणी करण्याचा निर्णय घेतला आहे. केवळ पाहणीच नाही तर उद्यान कर्मचार्‍यांसह सर्व अधिकार्‍यांची तातडीची बैठकही बोलवल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
कोमेजलेली उद्याने

17 एकर विस्तीर्ण परिसरातील वसंत कानेटकर उद्यान भकास झाले आहे. या उद्यानात दुर्मिळ वनस्पती, चांगली झाडे लावण्यासाठी थेट पाइपलाइन योजनेतून जोडणी दिली; मात्र एकाच महिन्यात ती खराब झाल्याने अनेक झाडे पाण्याअभावी सुकून जात आहेत. माँसाहेब मीनाताई ठाकरे उद्यान भकास झाले आहे. नीलकंठेश्वर महादेव मंदिर उद्यानात लॉन्स तर नाहीच; खेळण्यांचे सांगाडे तेवढे उरले आहेत.

खेळणी मिळणार तरी कधी ?
मीनाताई ठाकरे उद्यानाची संरक्षण जाळी व फरश्याही तुटल्या आहेत. उद्यानात खेळणीच शिल्लक नसल्याने आम्हाला त्याचा कोणताही फायदा होत नाही. आकाश पवार