आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

‘गारगाई-वैतरणा-कडवा-देवनदी’ लिंकद्वारे सिन्नरचा पाणीप्रश्न सुटेल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - पर्जन्यछायेच्या प्रदेशात माेडणाऱ्या सातत्याने दुष्काळाला सामाेरे जात असलेल्या सिन्नर तालुक्याचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटावा, यासाठी खासदार हेमंत गोडसे अाणि जलचिंतन संस्थेने याकरिता ‘गारगाई-वैतरणा-कडवा-देवनदी लिंक’ योजना राबविण्याचा तांत्रिक प्रस्ताव सुचवला हाेता. ताे राज्य शासनाने केंद्राकडे पाठविला. केंद्राच्या सूचनेवरून हैदराबादच्या राष्ट्रीय जलविकास अभिकरण कार्यालयाने त्याचा पूर्व शक्यता अहवाल (पीएफअार) राज्य शासनाला सादर केला अाहे. ताे व्यवहार्य ठरविण्यात अाला असून, तांत्रिक तपासणीनंतर सविस्तर प्रकल्प अहवाल (डीपीअार) राज्य शासनाकडून केंद्राला पाठविला जाईल.
ही दीर्घकालीन याेजना अमलात अाल्यावर सिन्नरचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी निकाली निघणार असून पाणी उपलब्ध झाल्यास उद्याेगवाढीस मदत हाेणार अाहे. शेजारीच असलेल्या इगतपुरी तालुक्यात प्रचंड पाऊस असताना सिन्नर तालुक्यात मात्र नेहमी दुष्काळी स्थिती हाेती. त्यावर कायमस्वरूपी उपायाेजना काय करता येईल याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी जलचिंतन संस्थेचे अभियंता राजेंद्र जाधव यांच्याकडून माहिती घेतली. ही तांत्रिक माहिती त्यांनी राष्ट्रीय जलव्यवस्थापन प्राधिकरणाला (एनडब्ल्यूडीए) कळविली. तसे लेखी पत्र देऊन सिन्नरसाठी ‘गारगाई-वैतरणा-कडवा-देवनदी लिंक’ प्रकल्प अहवाल तयार करण्याबाबत सुचवले. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत प्राधिकरणाने राज्य शासनास पत्र पाठवले. याबाबतचे शिफारसपत्र जलसंपदा विभागाने केंद्र सरकारला पाठवले. त्यानंतर केंद्र सरकारने पूर्व शक्यता अहवाल बनवण्याचे आदेश दिले. खासदार गोडसे आणि जलचिंतनचे राजेंद्र जाधव यांनी जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा करून राष्ट्रीय जलसंपदा विकास प्राधिकरणास लागणारी माहिती तत्काळ उपलब्ध करून दिली. त्यामुळे पूर्व शक्यता अहवाल सहा महिन्यांच्या विक्रमी वेळेत पूर्ण करून साेमवारी राज्य सरकारला सादर करण्यात आला. सरकारने त्यास व्यवहार्य म्हणून मान्यता दिली अाहे. त्यामुळे आता प्रकल्पाची तांित्रक तपासणी होऊन त्याचा सविस्तर अहवाल पुन्हा केंद्र सरकर अभिकरणाकडे सादर करण्यात येईल. ही योजना केंद्रामार्फत राबविण्याचा मनोदय गोडसे यांनी व्यक्त केला.

या प्रकल्पाची सविस्तर माहिती खासदार गाेडसे यांनी सिन्नरमध्ये पत्रकार परिषदेत दिली. आमदार राजाभाऊ वाजे, जलचिंतन संस्थेचे अध्यक्ष राजेंद्र जाधव, पंचायत समितीचे गटनेते उदय सांगळे, शिवसेनेचे तालुकाप्रमुख दीपक खुळे, माजी तालुकाप्रमुख बाजीराव बोडके, गोविंद लोखंडे, शहराध्यक्ष राहुल बलक, नगरपरिषदेतील गटनेते विजय जाधव आदी यावेळी उपस्थित होते.

काय अाहे गारगाई-वैतरणा-कडवा-देवनदी लिंक योजना : यामध्ये वैतरणाची उपनदी गारगाई दमणगंगेच्या उपनद्या वाघ-वाल यांच्या नाल्यांवर पाच धरणे बांधून टीएमसी पाणी लिफ्ट करून वैतरणा धरणात येईल. वैतरणा धरणातील एक टीएमसी पावसाळी पाणी वळवण्यास राज्य सरकारने यापूर्वीच मान्यता दिली आहे. अशाप्रकारे एकूण सात टीएमसी पाणी तेथून पुढे थेट पाइपलाइनने कडवा धरणात टाकण्यात येईल. कडवा धरणातून पुन्हा लिफ्ट करून ते पाणी सोनांबे येथे देवनदीच्या उगमात येईल. सोनांबे येथील धरणातून २.१ टीएमसी पाणी देवनदीच्या उगमात सोडून पावसाळी कालव्याने सर्व पाझर तलाव भरण्यात येतील. सिन्नर शहर-तालुका शिर्डीस पिण्यास थेट पाइपलाइनने ०.८ टीएमसी पाणी पुरवण्यात येईल. २.६० टीएमसी पाणी सिन्नर-माळेगाव उद्योग वसाहत प्रस्तावित दिल्ली- मुंबई इंडस्ट्रियल काॅरिडाेअरला पुरवण्यात येईल. उर्वरित १.५ टीएमसी पाणी उच्चस्तरीय पाइपलाइनने डुबेरे-रामोशीवाडी-दापूर-दोडी-नांदूरशिंगोटेमार्गे भोजापूर कालव्यास जोडण्यात येईल. यामध्ये भोजापूर धरणात म्हाळुंगी नदीस पाणी सोडण्याचा सुद्धा प्रस्ताव आहे. भोजापूर कालवा थेट पाइपलाइनच्या माध्यमातून दोडी-नांदूरशिंगोटे-निमोण-तळेगाव-रांजणगाव-मिरपूर-निर्मल पिंप्री-कोऱ्हाळे-काकडी शिवारापर्यंत वाढविण्यात येईल. अशा प्रकारे संपूर्ण सिन्नर तालुक्याचा दुष्काळ दूर करणारी ही योजना आहे.
बातम्या आणखी आहेत...