आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशिकमध्ये लवकरच पाइपलाइनव्दारे गॅस, एलपीजीपेक्षाही स्वस्त इंधन पर्याय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - नाशिकमध्ये लवकरच पाइपलाइनव्दारे गॅस वितरण सेवा सुरू होण्याची िचन्हे आहेत. यासाठी भारत सरकारची नवरत्न कंपनी असलेल्या गेल इंडियाकडून नुकतीच चाचपणी केली गेली. या योजनेसाठी सुमारे दाेनशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे.

विक्रमगड (जि. ठाणे) कडून जाणारी कंपनीची गॅस पाइपलाइन नाशिककडे वळवून हा प्रकल्प साकारण्यास कंपनीने रस दाखविला असून, याबाबत गेलकडून सर्वेक्षणही सुरू आहे. राज्यातील विविध एमआयडीसीत गेलकडून गॅस पुरवठा केला जातो. कंपनीच्या विस्तार योजनेत नाशिकचा समावेश करण्याचे नियोजन आहे. दहेज-उरण पुरवठा वाहिनी मार्गावर आपटी बुद्रुक येथे कंपनीचा तिसरा पुरवठा प्रकल्प असून, त्याचे अंतर नाशिकपासून ९५ किलोमीटर आहे. विक्रमगड येथे प्रस्तावित जोडणी देण्यात येणार असून, तेथून नाशिकचे अंतर ८५ किलोमरटर आहे. नाशिकमधील उद्योगांकडून सध्या प्रतिदिन १०० टन तर महिन्याला तीन हजार टन गॅस रिफील स्वरूपात घेतला जातो. त्यामुळे गेलच्या तज्ज्ञांनी नुकतीच याबाबत चाचपणी केली.

सिन्नरचाही समावेशाची शक्यता : नाशिक पेक्षाही या गॅसची दैनंदिन गरज सिन्‍नर एमआयडीसीत जास्त असल्याने अंतरही नाशिकपासून ३० किलोमीटर असल्याने सिन्‍नर एमआयडीसीचा यात समावेश होऊ शकतो.

नॅचरल गॅसचे वैशिष्ट्य....
*स्वच्छआणि पर्यावरणपूरक गॅस.
*एलपीजी डिझेलच्या तुलनेत स्वस्त
*स्टाेअरेज, पंपिंगची गरज नाही *इतर इंधनांच्या तुलनेत उच्च दर्जाची ज्वलनशीलता.
नाशिकमधील कोणत्या कंपनीकडून सध्या किती गॅसचा वापर दैनंदिन केला जात आहे, याची माहिती जमा करण्याचे आवाहन निमाने केले आहे.
- नैसर्गिक वायु वापराबाबत लवकरच कंपनी नाशिकमध्ये जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करणार आहेे. - रविवर्मा, अध्यक्ष,निमा

गेलकडून चाचपणी...
-गेलने आमच्याशी चर्चा करून औद्योगिक वापर, वाहनांकरिता एलपीजीचा वापर याबाबत माहिती घेतली. - मंगेशपाटणकर, सरचिटणीस,निमा