आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Gas Explosion In Note Press Canten , Worker Death

नोट प्रेस कॅन्टीनमध्ये गॅसचा भडका; कर्मचार्‍याचा मृत्यू

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिकरोड - करन्सी नोट प्रेसच्या कॅन्टीनमध्ये गॅसचा भडका होऊन भाजलेल्या कॅन्टीन कर्मचार्‍याचा सोमवारी दुपारी उपचारादरम्यान मृत्यू झाला. प्रेसच्या इतिहासातील अशा स्वरूपाची ही एकमेव घटना असल्याचे बोलले जाते.

सुटी भरण्यासाठी कर्मचार्‍यांना रविवारी काम दिले होते. रात्रपाळीत कर्मचार्‍यांना चहा देण्यासाठी साडेतीनच्या सुमारास संपतराव खंडेराव जाधव (वय 60, रा. शिंदे) यांनी गॅस पेटवताच ते 50 टक्के भाजले. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले; मात्र सोमवारी त्यांचा मृत्यू झाला.

इंडिया सिक्युरिटी व करन्सी नोट प्रेसच्या इतिहासात प्रथमच अशी दुर्दैवी घटना घडली आहे. प्रामाणिकपणे काम करणारे जाधव पुढच्या महिन्यात सेवानिवृत्त होणार होते. त्यापूर्वीच त्यांचा असा मृत्यू होणे दु:खद असल्याचे इंडिया सिक्युरिटी प्रेस मजदूर संघाचे कार्याध्यक्ष जगदीश गोडसे यांनी सांगितले.