आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एम. ई. आणि एम. टेकसाठी आता ‘गेट’ अनिवार्य...

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अभियांत्रिकीच्या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी एम.ई. एम.टेक. प्रवेशासाठी तंत्रशिक्षण संचालनालयाने ग्रॅज्युएट अॅप्टिट्यूूड टेस्ट इन इंजिनिअरिंग अर्थात गेट परीक्षा अनिवार्य करण्यात आली आहे. तंत्रशिक्षण विभागाच्या नव्या नियमावलीनुसार शैक्षणिक वर्ष २०१६ २०१७ यासाठी पदव्युत्तर पदवी अभियांत्रिकी प्रवेशासाठी गेट अनिवार्य करण्यात आल्याने अनेक विद्यार्थ्यांना प्रवेशापासून वंचित राहावे लागले होते. त्यामुळे पुढील शैक्षणिक वर्षासाठी फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी सध्या ऑनलाइन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू असून, ऑक्टोबरपर्यंत शेवटची मुदत आहे.

तंत्रशिक्षण संचालनालयाच्या नवीन नियमावलीनुसार यंदाच्या वर्षापासून अभियांत्रिकीच्या मास्टर ऑफ इंजिनिअरिंग मास्टर ऑफ टेक्नॉलॉजी या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमासाठी आयआयटी रुरकी या संस्थेतर्फे राष्ट्रीयस्तरावर गेट प्रवेश परीक्षा घेतली जाणार आहे. २०१७-२०१८ या वर्षासाठी होणाऱ्या प्रवेशप्रक्रियेसाठी अभियांत्रिकी विद्यार्थी तसेच औद्योगिक संस्थेच्या कर्मचाऱ्यांना ‘गेट २०१७’ ही प्रवेश परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. या परीक्षेसाठी ऑनलाइन फॉर्म भरण्याची प्रक्रिया सुरू असून, ऑक्टोबर २०१६ ही अंतिम मुदत आहे. गेट परीक्षा ही फेब्रुवारी २०१७ च्या पहिल्या आठवड्यात होणार आहे. विद्यार्थ्यांना अधिक माहिती अर्ज करण्यासाठी appsgate.iitr.ac.in या संकेतस्थळावर नोंदणी करता येईल. नाशिक विभागात एम.ई. एम.टेकसाठी १५०० हून अधिक जागा असून, नाशिक जिल्ह्यात ५०० जागा आहेत. विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षा अनिवार्य करण्यात आल्याने इच्छुक विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन के. के. वाघ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. केशव नांदूरकर यांनी केले आहे.

विद्यावेतन मिळणार
एम.ई.एम.टेकसाठी 'गेट’ या राष्ट्रीय स्तरावरील प्रवेश परीक्षेमध्ये 'पॉझिटिव्ह स्कोअर’ असणे आवश्यक आहे. तसेच, गेट परीक्षा उत्तीर्ण असलेल्या विद्यार्थ्यांना कटऑफमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांना केंद्र सरकारकडून विद्यावेतनही दिले जाते. - डॉ. व्ही. जे. गोंड, प्राचार्य, सपकाळ नॉलेज हब
बातम्या आणखी आहेत...