नाशिक : डाेपिंग शाेधण्याचे जितके प्रगत तंत्रज्ञान जगात अाणले जाते, त्यापेक्षा पुढचे तंत्रज्ञान वापरून डाेपिंग केले जात असल्याचे दिसत अाहे. रशियाने तर पदकतालिकेत त्यांचे नाव अग्रेसर राहावे म्हणून त्यांच्या खेळाडूंना अनेक वर्षांपासून डाेपिंग हे धाेरण म्हणून राबवले जात हाेते.
त्यामुळेच रिअाे अाॅलिम्पिकमध्ये त्यांच्या बहुतांश अॅथलिट्सवर बंदी घालण्यात अाली हाेती. अाता तर विदेशात ‘जीन डाेपिंग’सारख्या प्रकारांचा अवलंब केला जात असून, अशा गाेष्टींना पायबंद घालणे केवळ अशक्य बनले असल्याचेही जगविख्यात भारतीय लांबउडीपटू अंजू बाॅबी जाॅर्ज हिने रविवारी येथे पत्रकार परिषदेत सांगितले.
भारतीय खेळाडू काही खेळांत चमक दाखवतात, मात्र त्या खेळात नंतरच्या पिढ्यांकडून सातत्य दिसत नसल्याची अनेक कारणे असल्याचेही त्यांनी नमूद केले. चांगले खेळाडू, चांगले प्रशिक्षक, सुयाेग्य डाएट, प्रशिक्षित फिजिअाे अाणि सर्व साेयीसुविधा उपलब्ध झाल्या तर असे सातत्य कायम राखणे शक्य असल्याचेही तिने सांगितले.
खेळाडूंसह प्रशिक्षकांनीदेखील सातत्याने पुढील प्रशिक्षण देणे अावश्यक असते. बॅडमिंटनमध्ये पी. गाेपीचंद यांच्या अकादमीने या सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्यामुळेच त्या खेळात अापण महिला अाणि पुरुष अशा दाेन्ही प्रकारांत जागतिक स्तरावर सतत चमकत असल्याचेही तिने नमूद केले.
करिअरनंतरच्या जीवनाचा विचार करावा
खेळाडूंना डाेपिंगपासून दूर ठेवायचे असेल तर त्यांना तत्कालिक फायद्यापेक्षा त्याच्या गंभीर परिणामांची कल्पना देऊन त्यांचे प्रबाेधन करावे. करिअरनंतर जीवन अाहे अाणि ते तंदुरुस्तीने जगायचे असेल, तर डाेपिंगनंतर ते शक्य नसल्याच्या धाेक्यांची जाणीव त्यांना करून देणे अावश्यक असल्याचे ती म्हणाली.
या खेळात मिळू शकतात पदके
भारताला अॅथलेटिक्समध्ये प्रत्येक प्रकारात पदके मिळणे अनेक बाबींमुळे अवघड अाहे. त्यात जमैकन अाणि अाफ्रिकन खेळाडूंचे अाव्हान माेडीत काढणे कुणालाच जमलेले नाही. मात्र भालाफेक, गाेळाफेक, लांबउडी, उंचउडी तसेच ४०० मीटर किंवा ३००० मीटर स्टीपलचेससारख्या मध्यम पल्ल्याच्या धावण्याच्या शर्यतीत भारतीय अॅथलिट पदके जिंकू शकतात. त्यामुळे या प्रकारांवर अधिक भर देण्याचा अामचा प्रयास असल्याचेही अंजूने सांगितले.