आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सातपूर अतिक्रमण प्रकरणी आजची महासभा गाजण्याची चिन्हे

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - सातपूर येथील अतिक्रमण प्रकरणी नगरसेवक प्रकाश लोंढे यांना अपात्र ठरवण्याबाबत केलेल्या चौकशीचा अहवाल, तसेच मुख्य लेखाधिकारीपदावर एस. व्ही. घोलप यांच्याऐवजी परसेवेतून आलेले राजेश लांडे यांनाच नियुक्ती देण्यासंदर्भातील प्रस्तावामुळे शनिवारी (दि. १८) महासभा गाजण्याची चिन्हे आहेत.
सातपूर येथील ‘धम्मतीर्थ विहार’ या बांधकामप्रकरणी उच्च न्यायालयाने आयुक्तांना सविस्तर अहवाल महासभेवर ठेवण्याचे आदेश दिले. त्यानुसार, लोंढे यांच्यासंदर्भातील अहवालावर शनिवारी चर्चा होऊन अंतिम निर्णय हा घेणार आहे. मुख्य लेखा वित्त अधिकारीपदावर घोलप यांना यापूर्वीच पदोन्नती दिली असताना, तत्कालीन आयुक्तांनी पदानवत करून परसेवेतून आलेल्या लांडेंना नियुक्तीच्या मुद्यावरून गदारोळाची शक्यता आहे.