आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महाघाेटाळा अाणला उघडकीस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - शेअर बाजारात इनिशिअल पब्लिक अाॅफर (अायपीअाे)अर्थात प्राथमिक समभाग खरेदीच्या माध्यमातून मिळालेल्या संधीचा लाभ उठवून काळा पैसा चलनात अाणण्यासाठी बाेगस खरेदीदार दाखविण्यात अाले. त्यातून लाख, काेटींचा नव्हे, तर ते हजार काेटींचा घाेटाळा उघडकीस येऊन देशाच्या अर्थव्यवस्थेलाच धाेका निर्माण करणाऱ्या शेअर ब्राेकर्सची टाेळीच सीबीअायचे तत्कालीन अधीक्षक तथा पाेलिस अायुक्त एस. जगन्नाथन यांनी उघडकीस अाणली.

सेबीच्या एका तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यापासून ते अाराेपींपर्यंत पाेहाेचण्यापर्यंतच माेठे अाव्हान यंत्रणेसमाेर हाेते. जगन्नाथन यांनी ते पेलले. मुंबईसह परराज्यातील अाराेपींचे पाळेमुळे खणून काढत मुसक्या अावळल्या. या तपासाची सेबीने दखल घेत नवीन कायदे निर्माण करून शेअर्स खरेदी-विक्री व्यवहारांवर निर्बंध अाणण्यात अाले.
२००३ मध्ये शेअर बाजारात सातत्याने घसरण सुरू हाेती. त्यामुळे ‘सेबी’ (सिक्युरिटी अॅण्ड एक्सचेंज बाेर्ड अाॅफ इंिडया) ही शेअर बाजारातील व्यवहारांवर नियंत्रण ठेवणाऱ्या संस्थेने दखल घेत सर्व व्यवहारांवर बारकाईने लक्ष ठेवण्यास सुरुवात केली. त्याच काळात माेठ्या प्रमाणात वेगवेगळ्या कंपन्यांचे एकापाठाेपाठ ‘अायपीअाे’ बाजारात अाले. या समभाग खरेदी करण्यासाठी काेणत्याही अार्थिक नियमांचा भंग हाेणार नाही. पण प्रत्यक्षात गुंतवणूक करणारा सापडणारच नाही, समभागांचे वाटप झाल्यानंतर मात्र ते विकून काळा पैसा बाजारात लक्षात येणार नाही, अशा रितीने ‘व्हाइट इन्कम’ मध्ये बदलला जाईल, अशी यंत्रणा उभी करून सेबीला अाव्हान निर्माण झाले हाेते. या प्रकरणात सिंडिकेट असल्याचे लक्षात अाले. विशिष्ट फायदा असणारी ही एकजूट शेअर्स ब्राेकर्सनी नियाेजनबद्ध रीतीने घडविली हाेती. एका काॅर्पाेरेट खासगी बँकेने शेअर बाजारात लिस्टिंग हाेण्यापूर्वी जाहिरातीवर खर्च करीत वाजतगाजत ‘अायपीअाे’ बाजारात अाणला. पण त्याची जितकी सामान्य गुंतवणूकदारांना प्रतीक्षा हाेती, त्या प्रमाणात खरेदीला प्रचंड प्रतिसादही लाभला. मात्र, प्रत्यक्षात समभाग विक्रीनंतर कंपनीला पाहिजे तेवढा फायदा झाला नसल्याचे लक्षात अाले. याबाबत सेबीकडे तक्रार करताच त्यांच्याही हा प्रकार लक्षात अाला. त्यानुसार सेबीने सीबीअायकडे २००४ च्या सुरुवातीला तक्रार केली. सीबीअायच्या ‘बँकिंग सिक्युरिटीज फ्राॅड सेल’ या अंतर्गत तपास साेपविण्यात अाला. सेलचे प्रमुख तथा अधीक्षक एस. जगन्नाथन त्यांच्या साेबतच्या सहा अधिकाऱ्यांनी तपासाची सूत्रे स्वीकारली.

अायपीअाे जाहीर झाल्यानंतर किती समभाग वाटले जाणार अाहेत? त्यासाठी किती गुंतवणूकदारांनी मागणी नाेंदविली, त्यासाठी किती रक्कम भरली गेली इथपासून तपासाची सुरुवात करण्यात अाली. साधारणत:, अायपीअाेत कंपनीचे प्रवर्तक खासगी असल्यास स्वत:कडे ५५ टक्के समभाग राखीव ठेवतात. उर्वरित ४५ टक्के शेअर बाजारात सामान्य गुंतवणूकदारांना वाटून भांडवल उभारले जाते. कंपनीच्या नियमात बसणाऱ्या ज्यांना समभाग दिले गेलेले नाहीत. त्यांना मागणी नाेंदविताना केलेली रक्कम परत केली जाते. त्यांच्या नावे दिले गेलेले समभाग हे दलाल खरेदी करून घ्यायचे. त्यामुळे नियमित व्यवहारांमध्येही व्यत्यय येत असे अाणि दलालांच्या इशाऱ्यावर बाजारात वाढ-घसरण हाेत असल्यामुळे त्याचा काहीही अंदाज सामान्य गुंतवणूकदारांना नसल्यामुळे ट्रेडिंगमध्ये त्यांना जमा पुंजीही गमवावी लागली. कंपन्यांची मालमत्ता कमी हाेत असल्यामुळे त्यांनाही त्याचा फटका बसत असल्याच्या बाबी चाैकशीत प्रथमदर्शनी पुढे अाल्या.

अर्जांच्या चाैकशीत मिळाला क्ल्यू
संबंधित बँकेचे अायपीअाे खरेदीसाठी अालेल्या प्रत्येक अर्जांची चाैकशी पथकामार्फत करण्यात अाली. यात, एकाच कुटुंबीयातील वेगवेगळे नावे, त्यांचे वय, पत्ते यात किरकाेळ बदल अाढळून अाला. एकाच व्यक्तींच्या नावे अाठ ते दहा अर्ज भरताना नावाच्या स्पेलिंगमध्ये तर कुठे पत्त्यात ए-बी, प्लॅट क्रमांकात बदल दिसून अाले. चाैकशीतच जवळपास ९० टक्के अर्ज बनावट ग्राहकांचे असल्याचे निष्पन्न झाले. याच अर्जांभाेवती तपास फिरत असताना ज्या ब्राेकरने सर्वाधिक खरेदी केले, त्याला ताब्यात घेण्यात अाले. त्याने ‘न-नन्नाचा पाढा लावला. त्याला सीबीअायने खाकीचा धाक दाखविताच ताे कबूल झाला. त्याचे साथीदारही ताब्यात घेऊनही गुन्हा उघडकीस येत नव्हता. अर्ज भरताना जी रक्कम भरली हाेती, तीही एकत्रित केल्यास लाखाेंच्या घरात जात हाेती. यामागे निश्चितच माेठी कंपनी अथवा दहशतवादी संघटनेने ब्राेकर्सला अर्थसाहाय्य केल्याचा संशय व्यक्त केला जात हाेता. त्या दिशेने जगन्नाथन यांनी तपासाची सूत्रे फिरवली. प्रत्येक ब्राेकर्सचे फाेनकाॅल्स, त्यांचे बँकांमधील व्यवहार, विवरणपत्रांची तपासणी केली. सखाेल तपास करताना मुंबईसह हैदराबाद, चेन्नई, अहमदाबाद येथील ब्राेकर्स कंपन्यांच्या कार्यालयात छापे टाकण्यात अाले.

या ठिकाणी हाती लागलेल्या कागदपत्रांवरून ब्राेकर्सचे अर्थपूर्ण संबंध उघडकीस अाले. गुजरातमधीलच एका बड्या कंपनीनेच हा घाेटाळा घडवून अाणण्याच्या निष्कर्षाप्रत तपासी पथक पाेहाेचले.

एस. जगन्नाथन यांची सेबीने घेतली दखल
सीबीअायच्या पथकाने हा घाेटाळा उघडकीस अाणताच शेअर्स बाजार हादरून गेला हाेता. एस. जगन्नाथन यांनी दाेषाराेपपत्रात केलेल्या बाबींची सेबीने दखल घेत कायद्यात बदल केले. अायपीअाेसाठी व्यक्तिगत संस्थात्मक गुंतवणूकदार अशी विभागणी करण्यात अाली. प्रत्येक व्यवहारासाठी ‘डीमॅट’ अकाउंट केवायसीद्वारे पॅनकार्ड सक्तीचे करण्यात अाले. तसेच, ब्राेकरसाठीही ‘केवायडी अनिवार्य करण्यात अाले. त्यात हाताचे ठसे, डाेळ्यांच्या बुबुळांची प्रतिमा (रेटिना स्कॅनिंग) यांचा वापर करून प्रत्येक व्यवहारात अाेळख पटविणे अनिवार्य करण्यात अाले. त्यांना ‘सेबी’ची परवानगी अाणि गुंतवणुकीचा परवाना सक्तीचा करण्यात अाला.

शालेय विद्यार्थ्यांचेही अर्ज
ब्राेकर्सने गुंतवणूकदारांचे वय १८ ते २० दाखविले. मात्र, त्यांच्या छायाचित्रांवरून ते पंधरा वर्षांचे दिसले. त्यांच्या पत्त्यांवर चाैकशी करून संबंधितांची भेट घेतल्यावर ते शालेय विद्यार्थी हाेते. तुमचे फाेटाे कसे मिळाले, यावर ते म्हणाले की, शाळा सुटल्यावर घरी जात असताना काही लाेकांनी रस्त्यात थांबवून तुम्हाला कंपनीकडून नवीन गणवेश देण्यात येणार असल्याचे सांगितले. प्रत्येकाचे नाव, पत्ता घेतानाच फाेटाेही काढून घेतल्याची धक्कादायक बाब समाेर अाली. संबंधितांचे पॅनकार्डही बनावट असल्याचे निदर्शनास अाले. या तपासाअंती २० अाराेपींसह गुजरातस्थित शेअर्स कंपनीच्या प्रमुख संचालकांविरुद्ध सुमारे हजार पानांचे दाेषाराेपपत्र न्यायालयात दाखल करण्यात अाले.

शालेय विद्यार्थ्यांचेही अर्ज
ब्राेकर्सने गुंतवणूकदारांचे वय १८ ते २० दाखविले. मात्र, त्यांच्या छायाचित्रांवरून ते पंधरा वर्षांचे दिसले. त्यांच्या पत्त्यांवर चाैकशी करून संबंधितांची भेट घेतल्यावर ते शालेय विद्यार्थी हाेते. तुमचे फाेटाे कसे मिळाले, यावर ते म्हणाले की, शाळा सुटल्यावर घरी जात असताना काही लाेकांनी रस्त्यात थांबवून तुम्हाला कंपनीकडून नवीन गणवेश देण्यात येणार असल्याचे सांगितले. प्रत्येकाचे नाव, पत्ता घेतानाच फाेटाेही काढून घेतल्याची धक्कादायक बाब समाेर अाली. संबंधितांचे पॅनकार्डही बनावट असल्याचे निदर्शनास अाले. या तपासाअंती २० अाराेपींसह गुजरातस्थित शेअर्स कंपनीच्या प्रमुख संचालकांविरुद्ध सुमारे हजार पानांचे दाेषाराेपपत्र न्यायालयात दाखल करण्यात अाले.

नक्षलवादी ते अांतरराष्ट्रीय गुन्हेगारांवर नियंत्रण
सध्या नाशिकला पाेलिस अायुक्त असलेले १९९१ च्या बॅचचे अायपीएस अधिकारी एस. जगन्नाथन यांचा खात्यातील प्रवास थक्क करणारा अाहे. गडचिराेलीत तब्बल चार वर्षे अपर अधीक्षकपदावर कार्यरत असताना १००हून अधिक नक्षलींचे हल्ले परतवित त्यांना शरणागती पत्करण्यास भाग पाडले. २००३ ते २००८ पर्यंत सीबीअायच्या वेगवेगळ्या शाखांमध्ये अधीक्षक पदावर कार्यरत असताना हजाराे काेटींचे शेअर्स घाेटाळे असाे की बँकांचे बनावट कर्जप्रकरणे, काळा पैशांचे गुन्हे उघडकीस अाणण्यात ते यशस्वी ठरले. त्यापाठाेपाठ मुंबईवर झालेल्या २६ अाॅक्टाेबर २००८च्या हल्ल्यानंतर स्थापन झालेल्या ‘फाेर्सवन’ची संपूर्ण रचना, त्याचे प्रशिक्षण प्रमुख म्हणून त्यांनी कामगिरी बजावली. इथेच थांबता गृहमंत्रालयाने त्यांची २०११ मध्ये सीबीअाय इंटरपाेलसाठी फ्रान्स कॅनडा येथे नियुक्ती केली. तिथे चार वर्षे कार्यरत हाेते. या कालावधीतही त्यांनी अांतरराष्ट्रीय गुन्हेगारांच्या मुसक्या अावळण्यासाठी सर्वच सदस्यीय देशांच्या पाेलिसांना मार्गदर्शकाची भूमिकाही त्यांनी पार पाडली. याचबराेबर नुकत्याच पार पडलेल्या जागतिक स्तरावरच्या सिंहस्थ कुंभमेळ्याचा यशस्वी बंदाेबस्त त्यांच्या नावाने काेरला गेला अाहे.