आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीवनरक्षक औषधे उद्यापासून स्वस्त दराने, 151 घटकद्रव्यांवर आधारित औषधांचा समावेश

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - कॅन्सर, रक्तदाब, मधुमेह यांसह अनेक जीवनरक्षक औषधांच्या किमती 1 ऑगस्टपासून 30 टक्क्यांपर्यंत स्वस्त होणार आहेत. केंद्र सरकारने ड्रग्ज प्राईज कंट्रोल ऑर्डर अंतर्गत 17 जून 2013 रोजी जाहीर केलेल्या 154 घटकद्रव्यांची यादी जाहीर केली होती. त्यानंतर कंपन्यांना बाजारातील औषधविक्रेत्यांकडून जुन्या किमतींची औषधे परत बोलावून नव्या किमतींची छपाई करण्यासाठी देण्यात आली होती. त्यानुसार, कंपन्यांनी प्रक्रिया राबविली असून, नव्या दरातच औषधांची विक्री विक्रेत्यांना करावी लागणार आहे.

रुग्णांना स्वस्त औषधोपचार उपलब्ध व्हावे, याकरिता केंद्राने 394 औषधी घटकद्रव्याच्या किमती घटविल्या. त्यामुळे औषधांच्या किमतीही 25 ते 30 टक्क्यांनी कमी झाल्या आहेत. क्रोसिन, पेटापोझॉल, अँजिथ्रो मायसिन, सुमो एल, डायक्लोपॅरा टॅब्लेट यांसारख्या दैनंदिन वापरातील औषधांच्या किमतीही घटणार आहेत. दरम्यान उत्पादक, विक्रेते आणि वितरकांना सध्याच्या किमतीत औषधे विक्रीकरिता 46 दिवसांचा अवधी होता, तो 30 जुलैला संपला असून, 1 ऑगस्टपासून नव्या किमतीत औषध विक्री बंधनकारक आहे.

उत्पादकांकडून खरेदी करावी

मोठय़ा रुग्णालय चालकांनाही प्रशासनाने हृदयरोग, कर्करोग व मूत्रपिंड विकारावरील औषधे थेट उत्पादकांकडून अथवा घाऊक विक्रेत्यांकडून खरेदी करून रुग्णांना उपलब्ध करून द्यावेत. यामुळे रुग्णांना आणखी कमी किमतीत औषधे मिळतील, असा विश्वास अधिकार्‍यांनी व्यक्त केला आहे.

तर गुन्हे दाखल होणार

जुन्या दरात औषधे विक्री करताना आढळल्यास संबंधित किकोळ व घाऊक औषध विक्रेत्यांविरुद्ध नवीन आदेशान्वये गुन्हे दाखल होणार असल्याकडे अधिकार्‍यांनी लक्ष वेधले आहे.

जुन्या दराची औषधे परत करा
ज्या केमिस्टकडे जुन्या किमतीची औषधे शिल्लक असतील, त्यांनी जुन्या किमतीत औषधांची विक्री न करता ही औषधे होलसेलर्सकडे परत करायची आहेत. होलसेलर्स ही औषधे कंपन्यांना परत करतील. त्यानंतर कंपन्या नव्या दराचे रिलेबलिंग करून ती औषधे बाजारात आणतील. त्यामुळे नव्या छापील दरानुसारच औषधांची विक्री करावी. गोरख चौधरी, अध्यक्ष, नाशिक जिल्हा केमिस्ट अँण्ड ड्रगिस्ट असोसिएशन