आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नाशकातील पहिले जेनेरिक औषधालय मार्चमध्ये

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - पंचवटी लायन्स क्लबच्या वतीने नाशिक शहरातील पहिले जेनेरिक औषधालय मार्चमध्ये पंचवटी परिसरात उभारण्यात येणार आहे. हे औषधालय प्रामुख्याने हृदयरोग, रक्तदाब, मूत्रपिंड विकाराच्या रुग्णांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे प्रांतपाल राजकुमार राठोड व उपप्रांतपाल वैद्य विक्रांत जाधव यांनी संयुक्त घोषणा करताना सांगितले.

लायन्स इंटरनॅशनल या सामाजिक संस्थेच्या पुणे, नाशिक, अहमदनगर व मावळ या चार विभागांची द्वितीय प्रांतीय बैठक रविवारी नाशकात पार पडली. बैठकीत प्रमुख पाहुणे म्हणून प्रांतपाल राठोड, माजी आंतरराष्ट्रीय संचालक नरेंद्र भंडारी उपस्थित होते. याप्रसंगी उपप्रांतपाल वैद्य जाधव यांनी सांगितले की, प्रांतात 125हून अधिक क्लबचे सहा हजार सभासद आहेत. नाशिक विभागात सामाजिक व रुग्णसेवेसाठी आंतरराष्ट्रीय संघटनेकडून सुमारे एक कोटी 75 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. याअंतर्गत नेत्र रुग्णालयांना यंत्रसामग्री, मूत्रपिंड विकाराच्या रुग्णांसाठी डायलिसिसचे दहा यंत्र, हृदयरुग्णांसाठी रुग्णवाहिका सुरू करण्यात येणार आहे. तसेच, दुर्धर आजाराच्या रुग्णांसाठी अल्पदरात जेनेरिक औषधांचे स्टोअर पंचवटीत सुरू करण्यात येणार आहे. ग्रामीण भागात 18 कॉम्प्युटर्स शाळांना देण्यात आल्याची माहिती माजी अध्यक्ष जयंत येवला यांनी दिली. राजेंद्र वानखेडे यांनी बोधचिन्हाचे प्रकाशन करून प्रांतपालांचा शपथविधी टोरंटो येथे होणार असल्याची माहिती दिली. राजेश कोठावदे यांनी आभार मानले.