आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डीजेचा दणका यंदा विरला, ढाेलचा गजर मात्र वाढला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - ढाेलवर पडणारी शिस्तबद्ध थाप, त्यातून अासमंत छेदणारा दमदार अावाज अन् त्याला ताशाच्या तर्रीची मिळणारी साथ अशाच अस्सल मराठमाेळ्या वातावरणात गणेशाेत्सव मिरवणूक पार पडली. नेहमीचा डीजेचा दणदणाट कायद्याच्या काटेकाेर अंमलबजावणीमुळे विरल्यामुळे गणेशभक्तांना चांगलाच दिलासा मिळाला. संपूर्ण मिरवणुकीत ढाेल-ताशेच वरचढ ठरत असल्याचे दिसत हाेते.
महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे आदेश धाब्यावर बसवून गणपती विसर्जन मिरवणुकांमध्ये कानठळ्या बसविणाऱ्या डीजेचा सर्रास वापर होतो. गेल्या काही वर्षांपासून तर ‘कोणाच्या डीजेचा आवाज मोठा?’ अशी स्पर्धा या मंडळांत लागते. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे काटेकाेरपणे पालन करण्याचा इशारा यंदा पाेलिसांनी दिला हाेता. उत्सवकाळात नियमाप्रमाणे ८५ डेसिबलपर्यंत ध्वनी चालू शकताे. मात्र, त्यापेक्षा माेठा अावाज अाल्यास कायद्याचा भंग हाेताे. मर्यादेपेक्षा अधिक अावाज ठेवणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा पाेलिसांच्या वतीने देण्यात अाला हाेता. तसेच, अनेक मंडळांवर कारवाईदेखील करण्यात अाली. मिरवणुकीत ट्रकवर ध्वनिवर्धकांची भिंत उभारून दणदणाट करणाऱ्या गणेशोत्सव मंडळांना संभावित कारवाई टाळण्यासाठी यंदा काही प्रमाणात सुबुद्धी झाली.

डीजेच्या दणदणाटामुळे होणारे ध्वनिप्रदूषण आणि त्याचा नागरिकांना होणारा त्रास पाहून काही मोठ्या गणेश मंडळांनी यंदा डीजेला सोडचिठ्ठी देण्याचा निर्णय घेतला. तर, काही मंडळांनी पारंपरिक वाद्यांच्या गजरात गणरायाची मिरवणूक काढण्याचा निर्णय घेतला. त्यांचा कित्ता लहान मंडळांनीही गिरवला, तर काही मंडळांनी डीजेचा वापर करताना अावाजाची मर्यादा पाळली. त्यामुळे यंदाची मिरवणूक सुसह्य हाेती, अशा भावना गणेशभक्तांनी व्यक्त केल्या. डीजेला पर्याय म्हणून यंदा ढाेल-ताशांना अाणि त्यातही नाशिक ढाेलला अधिक प्राधान्य देण्यात अाले. त्यामुळे मिरवणुकीत अस्सल मराठमाेळे वातावरण तयार झाले अाहे.

पारंपरिक ढाेल पथकांबराेबरच अाधुनिक पिढीने तयार केलेले ग्रुप्स, त्यांचे एकसारखे पेहराव, पथकांमधील तरुणींचा सहभाग अाणि मंत्रमुग्ध करणारा ताल या बाबीदेखील मिरवणुकीत लक्षवेधी ठरल्या.

बातम्या आणखी आहेत...