आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जर्मन कंपनी करणार नाशकात गुंतवणूक

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - जर्मनीतील ऑटोमेशन तंत्रज्ञानावर आधारित अत्युच्च दर्जाची उत्पादने निर्मित करणारी ‘स्ट्रामा एमपीएस’ कंपनी आपला उत्पादन प्रकल्प नाशिकमध्ये सुरू करणार आहे. यासाठी कंपनीने अंबड एमआयडीसीमधील सुमीत इंजिनिअर्स अॅण्ड कन्सल्टन्स कंपनीशी भागीदारी करार केला असून, नाशकातील या प्रकल्पातून किमान तीनशे रोजगार निर्माण होणार आहे.
जर्मन सरकारकडून राबविल्या जात असलेल्या इंडो-जर्मन प्रकल्पांतर्गत जर्मनीच्या अभ्यास प्रशिक्षण दौ-यावर गेलेल्या नाशिकच्या सुमीत इंजिनिअर्स कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक रवी महादेवकर यांना ही संधी मिळाली आहे. सीआयआय आणि अंबड इंडस्ट्रीज अॅण्ड मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचे सहकार्य या प्रकल्पातील सहभागासाठी महत्त्वाचे ठरल्याचे महादेवकर यांनी सांगितले.

जर्मनीतील ‘स्ट्रामा एमपीएस’ कंपनीच्या उत्पादनांकरिता भारतातील विपणन आणि विक्री यांची जबाबदारी सुमीत इंजिनिअर्सवर चार वर्षांपूर्वी टाकण्यात आली होती. नाशिकमध्ये बॉश ही कंपनी या उत्पादनांकरिताची माेठी ग्राहक आहे. सुमीत इंजिनिअर्सने केलेली ही कामगिरी स्ट्रामा एमपीएसच्या पसंतीस उतरल्याने त्यांनी आपला उत्पादन प्रकल्प भारतात आणि ताेही नाशिक अथवा शहराच्या परिसरात सुरू करण्याचे निश्चित केले असून, त्याकरिता सुमीत इंजिनिअर्सबरोबर भागीदारी करारही केला आहे. या करारावर सुमीत इंजिनिअर्सकडून फेब्रुवारी रोजी जर्मनीत स्वाक्षरी केली जाणार आहे.

नाशिकमध्येच प्रकल्पासाठी आग्रही
उत्पादनप्रकल्प नाशिक वा परिसरात सुरू करावा अशी आमची इच्छा आहे. मात्र, जागा उपलब्ध होणेही गरजेचे असून शोध सुरू आहे. स्ट्रामा सुमीत इंडिया प्रा. लि. असे सुरू हाेणा-या नव्या कंपनीचे नाव असेल. रवीमहादेवकर, व्यवस्थापकीय संचालक, सुमीत इंजिनिअर्स अॅण्ड कन्सल्टंट

इंडो-जर्मन प्रकल्पाचा फायदा
जर्मनसरकारकडून भारतीय उद्योजकांना इंडो-जर्मन प्रकल्पातून जर्मनीत प्रशिक्षणासाठी आमंत्रित करण्यात येते. त्या ठिकाणचे उद्योग आणि भारतातील उद्योग यांच्यातील दरी दूर केली जाते. जेणेकरुन दोन्ही देशांदरम्यान व्यवसायवृध्दीची मोठी संधी उपलब्ध होते. आयमाकडून अशा संधी उद्योजकांना उपलब्ध करून दिल्या जातात, त्याचा फायदा घ्यायलाच हवा, हे महादेवकर यांच्या उदाहरणातून स्पष्ट होते. विवेकपाटील, अध्यक्ष, आयमा