आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कांद्याच्या राजकारणावर जर्मनीच्या ‘प्रो-७’तर्फे लघुपट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लासलगाव - लासलगावच्या कांद्यावर आता जर्मनीमध्ये लघुपट तयार होणार असून, या कांद्यामुळे भारतात राजकारण शिजते कसे, यावर चित्रीकरणासाठी लासलगाव बाजार समितीमध्ये जर्मनीचे नावाजलेले प्रो-७ चॅनलची टीम बाजार समितीमध्ये काम करीत आहे.
बाजार समितीत आज जर्मनीमधील एक नंबर लोकप्रिय चॅनल प्रो-७ यांच्या गलिलियो या कार्यक्रमासाठी या टीमने आज लासलगाव बाजार समितीत भेट दिली. कांद्याची लोकप्रियता, लागवड, उत्पादित होणारा कांदा, कांद्याचे लिलाव पद्धत, वजनमाप अशा विविध माहितीसाठी प्रो-७ चॅनलचे एडिटर सराहा, डोरोथिया आदी लासलगावमध्ये आलेले होते.

प्रथमच जर्मनीमध्ये कांद्यावर लघुपट बनविण्यासाठी या टीमने लासलगाव बाजार समिती सभापती नानासाहेब पाटील, व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष नंदकुमार डागा, सचिव बी. वाय. होळकर आणि कांदा व्यापारी ओमप्रकाश राका आणि कांदा उत्पादक शेतकरी यांच्याकडून कांद्याबाबत सखोल माहिती घेतली.