आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घंटागाडी कामगाराचा मृतदेह पालिकेसमाेर ठेवून अांदाेलन, कचरा गाेळा करताना झाला अपघात

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - अपघातात मृत्यू झालेल्या घंटागाडी कामगाराचा शवविच्छेदन केलेला मृतदेह नातेवाइकांनी पाच लाख रुपयांच्या भरपाईच्या मागणीसाठी थेट महापालिकेचे मुख्यालय असलेल्या राजीव गांधी भवनच्या प्रवेशद्वारावर ठेवत गुरुवारी दुपारी वाजता अांदाेलन केले. सुमारे चार तास हे अांदाेलन सुरू हाेते. अखेर पाेलिसांनी बळाचा वापर करत रात्री वाजता अांदाेलकांना ताब्यात घेतले तिढा साेडवला. पालिका आणि घंटागाडी कामगारांच्या या वादात पोलिसांसह नागरिक मात्र वेठीस धरले गेले.

घंटागाडी कामगार श्रावण सोमा टोंगारे (३८, रा. आनंदवल्ली) हा एमएच १५, एबी ४०९३ या घंटागाडीवर काम करत हाेता. गुरुवारी (दि. १६) सकाळी वाजता कचरा गोळा करत असताना हिरावाडीतील चाँदवलशाह बाबा दर्ग्यासमाेर एका कारने (एमएच १५, एबी १३४६) त्यास धडक िदल्याने ताे जागीच ठार झाला. या प्रकरणी पंचवटी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. मृतदेहाचे जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन झाले. नातेवाइकांनी मृतदेह ताब्यात घेत तो थेट राजीव गांधी भवनसमोर नेऊन ठेवला. सरकारवाडा पोलिसांनी हस्तक्षेप करत नातेवाइकांची समजूत काढत अतिरिक्त आयुक्त अनिल चव्हाण यांच्याशी चर्चा घडवून आणली. नातेवाइकांनी लाख रुपये भरपाई देण्याची मागणी केली. महापालिकेने केवळ १० हजार रुपयांची भरपाई देण्यात येईल, असे सांगितले. यामुळे नातेवाइकांच्या संतापाचा उद्रेक झाला. घंटागाडी कामगारांसह सुमारे शंभर नातेवाइकांनी पालिका प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. आंदोलन चिघळण्याची शक्यता लक्षात घेत पोलिसांनी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात केला होता. नातेवाइकांसह कामगार एेकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. अखेर पोलिस उपआयुक्त निसार तांबोळी यांनी सर्व सूत्रे हाती घेतले पोलिसांनी बळाचा वापर करत आंदोलकांसह नातेवाइकांची धरपकड करत पोलिस वाहनात बसवले. आंदोलकांना चिथावणी देणाऱ्या नेत्यांना पोलिस शोधत होते. मात्र, गर्दीचा फायदा घेऊन त्यांनी पलायन केले. अचानक झालेल्या गोंधळाने शरणपूररोडवर वाहतूक कोंडी झाली होती. पोलिस आयुक्त निसार तांबोळी, अविनाश बारगळ, वरिष्ठ निरीक्षक शांताराम अवसरे, हेमंत सोमवंशी, मधुकर कड यांच्यासह दोनशे कर्मचाऱ्यांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

नागरिक वेठीस :
पालिकाघंटागाडी कामगारांच्या वादात नागरिक पोलिसांना वेठीस धरले गेले. या आंदोलनामुळे वाहतूक काेंडी झाल्याने वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागला.

पोलिस अधिकाऱ्यांची बघ्याची भूमिका
आंदोलकांचीसमजूत काढता पोलिस उपआयुक्तांसह पोलिस अधिकाऱ्यांनी बघ्याची भूमिका घेतल्याने आंदोलन चिघळले. नंतर मात्र बळाचा वापर करावा लागला.

मृतदेहाचा सन्मान :
आंदोलकांनाताब्यात घेत असताना नातेवाईक मृतदेहास सोडून पळाले. पोलिस उपआयुक्त निसार तांबोळी यांनी अधिकाऱ्यांना सूचना करत मृतदेह सन्मानाने रुग्णवाहिकेत ठेवण्यास सांगितला.

नेत्यांचे पलायन :
घंटागाडीकामगारांसह नातेवाइकांना चिथावणी देणाऱ्या नेत्यांचा पोलिस शोध घेत असल्याने हे नेते गर्दीचा फायदा घेत पळून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. घंटागाडी कामगारांनी ठेकेदाराविरुद्ध आंदोलन करणे अपेक्षित होते, अशी चर्चा सुरू हाेती.

पोलिसांमध्ये दिसली माणुसकी
मृताच्या नातेवाइकांपैकी काही महिलांना जाण्याची सुविधा नसल्याने त्या तेथेच रडत बसल्या होत्या. ही बाब समजल्यानंतर उपआयुक्त तांबोळींनी त्यांची घरी जाण्याची व्यवस्था केली.

कामगारांना वाऱ्यावर सोडले
^घंटागाडीकामगारांचा अपघाती विमा नाही. पालिकेकडून सहकार्य मिळत नाही. नादुरुस्त घंटागाड्यांमुळे अपघात होत आहेत.
- कॉ.राजू देसले
आंदोलन बेकायदेशीर
घंटागाडीकामगारांचे हे आंदोलन बेकायदेशीर आहे. अांदाेलकांची समजूत काढूनही एेकत नसल्याने बळाचा वापर करावा लागला.
-निसार तांबोळी, पोलिसउपआयुक्त, प्रशासन
फोटो पालिका मुख्यालयासमाेर अांदाेलन करणाऱ्यांना पकडून वाहनात बसविताना पाेलिस.