आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

प्रशासनाच्या नाकर्तेपणामुळे सर्रास गुटखाविक्री, चिमुकल्यांच्या अाराेग्यालाच कात्री

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक - लहान मुलांच्या अाराेग्याची काळजी घेतानाच त्यांचे संरक्षण व्हावे, यासाठी केंद्र सरकारने जुव्हेनाइल जस्टिस २००५ नुसार (मुलांची काळजी संरक्षण) हा कायदा १५ जानेवारी २०१६ पासून देशभरात लागू केला. या कायद्याच्या कलम ७७ नुसार जी व्यक्ती १८ वर्षांखालील मुलांना किंवा मुलींना तंबाखूजन्य पदार्थ अथवा नशा अाणणाऱ्या पदार्थांची विक्री करेल, त्या व्यक्तीवर या कायद्यांतर्गत कठाेर कारवाई करण्याची तरतूद अाहे. मात्र, नाशिक महापालिका विभागात या कायद्याबाबत काेणत्याही प्रकारची जनजागृती करता फक्त कागदाेपत्रीच कायद्याची नाेंद करण्यात अाली असल्याचे ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत समाेर अाले अाहे.
शहरात शाळकरी मुलांसह १७ वर्षांपर्यंतच्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना सर्रास गुटख्यापासून तंबाखूच्या पुड्या, सिगारेट, मावा याची उघड विक्री हाेत अाहे. यामुळे प्रशासनाला खुले अाव्हान दिले जात असून, सामाजिक अाराेग्याचा प्रश्न गंभीर बनत चालला अाहे.
गुटखा विक्री कागदावरच... : गुटखाबंदीअसतानाही नाशिक विभागात सर्वत्र गुटख्याची विक्री उघडपणे सुरू अाहे. अन्न अाैषध प्रशासनाचा विक्रेत्यांवर काेणताही वचक नसल्यामुळे हा व्यवसाय बेमालूमपणे सुरूच असल्याचे ‘डी. बी. स्टार’ने यापूर्वीच उघडकीस अाणले हाेते. गुटखाविक्री बंदीतून सरकारने महसुलावर पाणी साेडले असले तरी चिरीमिरीच्या प्रलाेभनामुळे या व्यवसायाकडे अाजही साेयीस्करपणे दुर्लक्षच केले जात अाहे. गुटखाबंदीपाठाेपाठ केंद्र सरकारने लहान बालकांना तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कठाेर कारवाई करण्याचा कायदा अमलात अाणला अाहे. मात्र, त्याची प्रभावी अंमलबजावणी कधी हाेणार, याबाबत प्रश्नचिन्ह कायम अाहे.

‘अर्थ’पूर्णसंबंधांमुळे कारवाईत दुर्लक्ष : राज्यातगुटखाबंदी असतानाही शेजारील राज्यातून शहरात माेठ्या प्रमाणात गुटख्याची अायात केली जात असल्याचे समजते. गुजरातमधून स्वस्तात मिळणाऱ्या गुटख्याची छुप्या पद्धतीने अव्वाच्या सव्वा भावात विक्री केली जात अाहे. गुटख्याच्या अाहारी सर्वाधिक शालेय महाविद्यालयीन विद्यार्थी जात असून, अन्न अाैषध विभागाच्या ‘अर्थ’पूर्ण संबंधामुळे ही विक्री सर्रासपणे सुरू असल्याचे बाेलले जाते.

शाळा-काॅलेजपरिसरातही विक्री : काेटपाकायद्यानुसार शालेय परिसराच्या १०० मीटर अंतरावर सार्वजनिक ठिकाणांवर तंबाखूजन्य पदार्थांची विक्रीस मनाई अाहे. मात्र, तरीही विक्री सुरू अाहे. अशा विक्रेत्यांवर कारवाई करण्यातही अन्न अाैषध प्रशासनाला मुहूर्त सापडत नसल्याने शाळा-महाविद्यालयीन परिसरातील विक्रेत्यांचे धारिष्ट्यही वाढतच अाहे.

कायदा काय सांगताे..?
कलम ७७ नुसार जाे काेणी एखाद्या मुलास नशा अाणणारे द्रव्य, गुंगी अाणणारे अाैषध किंवा तंबाखू तंबाखूजन्य पदार्थ, मानसिक स्थिती बदलणारी अाैषधे देईल किंवा देण्यास भाग पाडेल, त्यास कलम (१२) नुसार म्हणजे १८ वर्षे पूर्ण झालेल्या काेणत्याही व्यक्तीस वर्षांपर्यंत कठाेर कारावास किंवा एक लाख रुपयांपर्यंतच्या दंडाची शिक्षा देण्याचा कायदा अाहे.

कायद्याची माहिती नाही, कारवाई करणार कशी?
गुटखाविक्री राेखण्याची प्रमुख जबाबदारी असलेल्या अन्न अाैषध प्रशासन विभागाकडे लहान मुलांच्या कायद्याबाबत चाैकशी केली असता, त्यांना फक्त शालेय परिसराच्या अावारात १०० मीटरवर अमली पदार्थांची विक्री करता येत नसल्याच्या कायद्याची माहिती असल्याचे जाणवले. ‘डी. बी. स्टार’ प्रतिनिधीने अन्न अाैषध प्रशासन विभागाचे सहअायुक्त उदय वंजारी यांच्याशी चर्चेतून वारंवार या कायद्याविषयी बाेलण्याचा प्रयत्न केला. मात्र, ‘असा काहीतरी कायदा अाहे. मी बघताे,’ असे माेघम उत्तर एेकावयास मिळाले.
अन्न अाैषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून सर्वत्रच सर्रास चढ्या भावाने गुटख्याची विक्री सुरू अाहे. ते रुपयांना मिळणारी गुटख्याची पुडी अनेक विक्रेते १० रुपयांनाही विकतात. काही ठिकाणी छुप्या पद्धतीने कागदाच्या पुड्यांमध्ये बांधून गुटखाविक्री हाेते. शालेय विद्यार्थी तसेच महाविद्यालयीन युवकही या अमली तथा तंबाखूजन्य पदार्थांच्या अाहारी जात असताना युवा पिढी नष्ट हाेण्याची भीती व्यक्त केली जात अाहे. चिमुकल्यांच्या अाराेग्याशी सुरू असलेला हा खेळ प्रशासनाच्याच कृपेने चांगलाच जाेमात सुरू असल्याचे धक्कादायक वास्तव अाता ‘डी. बी. स्टार’ने उजेडात अाणले अाहे.

अधिकाऱ्यांची तपासात दिरंगाई
^नियम अथवा कायद्याचे जनता नि:संकाेचपणे पालन करते. मात्र, प्रशासकीय यंत्रणेतील अधिकारीच तपासात दिरंगाई करतात. चिरीमिरीसाठी सर्रास नियम पायदळी तुडविले जातात. खऱ्या अर्थाने नियमांची अंमलबजावणी हवी असेल तर शासकीय अधिकाऱ्यांनी कार्यालयात बसून खुर्च्या गरम करण्यापेक्षा बाहेर पडून कारवाईचा बडगा उचलण्याची गरज अाहे. -प्रकाश निगळ, सामाजिक कार्यकर्ते

प्रशासनाकडून जनजागृती व्हावी...
^गल्लीबाेळातील पानटपऱ्या,किराणा दुकानांमधूनही तंबाखूजन्य वस्तूंची सर्रास विक्री केली जाते. व्यावसायिकांना जरी शासकीय नियमांची माहिती नसल्यास अधिकाऱ्यांनी त्यासंदर्भात जनजागृती करणे गरजेचे अाहे. तसेच, सामाजिक भान ठेवून व्यावसायिकांनी स्वत:हून पुढाकार घेत लहान मुलांना तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करू नये. -साेपान शहाणे, पदाधिकारी, महिंद्रा युनियन

रेडक्राॅस सिग्नल परिसर
‘डी. बी. स्टार’ प्रतिनिधीने प्रातिनिधिक स्वरूपात शहरातील काही भागात शाळकरी विद्यार्थ्यांना पाठवून तंबाखूजन्य पदार्थांची विक्री हाेते की नाही, याबाबत तपासणी केली. मात्र, कुठल्याच ठिकाणी विक्रेत्यांनी या मुलांना हटकता उघडपणे विक्री केली. माेजक्या उत्पन्नासाठी चिमुरड्यांच्या अाराेग्याशी खेळ करणाऱ्या या विक्रेत्यांचे सामाजिक भानही हरपल्याचे या पाहणीतून स्पष्ट झाले अाहे. अशा विक्रेत्यांवर कारवाईची गरज मात्र अन्न अाैषध प्रशासनाला वाटू नये, याहून माेठे दुर्दैव काय?

हे प्रकार तरी कितपत याेग्य..?
गुटखाविक्री करणाऱ्यांकडून लहान मुलांना गुटखा वा तंबाखूजन्य पदार्थांची विक्री हाेत असताना, काही विक्रेते तर अापल्या नातेसंबंधातील वा घरातील चिमुरड्यांना अशाप्रकारे दुकान सांभाळण्यास प्रवृत्त करीत असल्याचे दिसून अाले अाहे. असे नियमबाह्य प्रकार चिमुकल्यांना व्यसनाधीनतेकडे अाेढण्यास पुरेसे ठरत असल्याने त्यावर कडक कारवाई करण्याची मागणी हाेत अाहे.
थेट प्रश्न
सार्वजनिक अाराेेग्याच्या दृष्टीने राज्यात गुटखाबंदीचा कायदा तर झाला; मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी अाजपावेताे हाेऊ शकली नाही. व्यसनाधीन तरुणांचा अाकडा थक्क करणारा असतानाच, अाता शालेय विद्यार्थीदेखील या तंबाखूजन्य पदार्थांच्या अाहारी जात असल्याचे धक्कादायक वास्तव ‘डी. बी. स्टार’च्या पाहणीत समाेर अाले अाहे. मुळात लहान मुलांना तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणे नियमबाह्य असताना, त्यांच्या अाराेग्याला विघातक ठरणाऱ्या कृत्यास विराेध करण्याची भूमिकाच विक्रेते घेत नसल्याचे दिसून येत अाहे. ‘डी. बी. स्टार’ने प्रातिनिधिक स्वरूपात काही शालेय गणवेशातील लहान मुलांना तंबाखूजन्य पदार्थ घेण्यासाठी पाठविले असता एकाही विक्रेत्याने या मुलांना हटकले नाही, उलट उघडपणे पदार्थ देऊ केले. खुलेअाम प्रशासनाला अाव्हान देणाऱ्या या अाराेग्याशी निगडित प्रकारावर ‘डी. बी.
स्टार’चा हा प्रकाशझाेत...
{‘अन्न अाैषध’च्या अधिकाऱ्यांना पडला कारवाईचा विसर
{विक्रेत्यांकडून पैशांसाठी नियमांना दिली जातेय बगल
डाॅ. बी. अार. गायकवाड, वैद्यकीयअधीक्षक, नाशिक महापालिका
{ लहान मुलांना तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करू नये, या केंद्र सरकारने १५ जानेवारीपासून लागू केलेल्या कायद्याप्रमाणे अद्यापपर्यंत किती ठिकाणी कारवाई करण्यात अाली अाहे?
-केंद्र सरकारने हा कायदा लागू केला अाहे. याबाबत नागरिकांच्या माहितीसाठी प्रसिद्धिपत्रकही काढण्यात अाले अाहे. मात्र, अशा व्यावसायिकांवर स्वच्छता निरीक्षकांकडून कारवाई केली जाणे अपेक्षित अाहे.
{स्वच्छता निरीक्षकांना अशी कारवाई करण्याचा अधिकार अाहेे का?
-हा विषय अाराेग्य विभागाचा असल्यामुळे स्वच्छता निरीक्षकांकडूनच नियमबाह्य विक्री करणाऱ्यांवर कारवाई करणे अपेक्षित असते.
{वैद्यकीय विभागाने प्रसिद्धीस काढलेल्या पत्राबाबत अाराेग्य विभागाला काेणत्याही प्रकारची माहिती नाही. मग ते कसे कारवाई करणार?
-केंद्र सरकारच्या या कायद्याचे सध्या फक्त नाेटिफिकेशन अाहे. अाता तुम्ही सांगितल्यामुळे यापुढे शहरात या कायद्याची तातडीने अंमलबजावणी करू.
बातम्या आणखी आहेत...