आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अनेक वर्षे मंत्रिपद लाभूनही शहरात विकासाचा ठणठणाट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
येवला - मोदी सरकारने दोन वर्षांत १०० योजना जनतेच्या हितासाठी सुरू केल्या असून, भारताचा आवाज देशात पोचला आहे. एका ठराविक पक्षाची सत्ता आणि अनेक वर्षे मंत्रिपद लाभूनही या शहरात विकासाचा ठणठणात आहे, असा टाेला राष्ट्रवादी काँग्रेस छगन भुजबळांचे नाव घेता जलसंपदामंत्री तथा पालकमंत्री गिरीश महाजन यांनी लगावला.
भाजप शिवसेनेच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ अायाेजित सभेत ते बाेलत हाेते. यावेळी आमदार राहुल आहेर, माजी आमदार मारोतराव पवार, कल्याणराव पाटील, ज्येष्ठ नेते सुरेशबाबा पाटील, जिल्हा बँक संचालक किशोर दराडे, प्रदेश उपाध्यक्ष सुनील बागुल, लक्ष्मण सावजी, शिवसेनेचे नेते संभाजी पवार, जिल्हाध्यक्ष दादा जाधव, आत्माराम कुंभार्डे तसेच उमेदवार बंडू क्षीरसागर, सूरज पटणी, माया परदेशी, कुणाल परदेशी, छाया क्षीरसागर, छाया देसाई, वीरेंद्र मोहारे आदी यावेळी उपस्थित होते.

अनेक वर्ष सत्ता आणि पालकमंत्रीपदी असतानाही जिल्ह्यात साध्या पायाभूत सुविधादेखील मिळालेल्या नाही. मनमाडला २५ दिवसांनी पाणी मिळते, हा विकास आहे का? असा सवाल करुन स्मार्ट सिटी ही मोदींची संकल्पना येथे राबवून शहराचा चेहरा-मोहरा बदलवण्यासाठी तुम्हाला जे जे मागितले ते ते दिले जाईल, असे महाजन म्हणाले.

माजी आमदार कल्याणराव पाटील म्हणाले की, १५ वर्षांत सत्ता असताना विकास केला पण, तो कुठे आहे? जेलमध्ये बसणाऱ्यांचे फोटो टाकून मते मागण्याची वेळ राष्ट्रवादीवर आलेली आहे. मात्र, मतदार परिवर्तन करणार असून, एका वर्षात चांदवड मध्ये तब्बल १८ कोटींची विकास कामे झाल्याची माहिती त्यांनी दिली. भाजपाचे शहराध्यक्ष आनंद शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी भाजपा नेते बापू पाटील, श्रीकांत गायकवाड, मर्चंटस् बँक संचालक अरुण काळे, मनोज दिवटे, गोरख खैरनार, नाना लहरे, गोपाळ बाबर, गणेश खळेकर, गीताराम दारुंकर, गाडेकर, सविता बाबर, दिनेश परदेशी, किशोर परदेशी, राजू मोहारे, दिनेश परदेशी, राम बडोदे आदी उपस्थित होते.

येथील विस्थापित गाळेधारकांनी समस्यांची माहिती दिली असती तर त्यांना मदत करता अाली असती. आता गाळेधारकांचे पुनर्वसन करण्यासाठी आपण मुख्यमंत्र्यांकडे बैठक घेऊन कमीतकमी अनामत रकमेत गाळे उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन पालकमंत्री गिरीश महाजन यांनी येथील विस्थापित गाळेधारकांना दिले. गाळेधारकांच्या वतीने गणेश दोडे, डिगू सोनवणे, संतोष भावसार आदींनी महाजन यांची भेट घेऊन न्याय देण्याची मागणी केली. नगरपालिकेवर असलेले २२ कोटी रुपयांचे कर्ज कमी करण्यासंदर्भातही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही चर्चा करण्याचे आश्वासन महाजन यांनी पदाधिकाऱ्यांना दिले.
येवला येथे अायाेजित सभेत बाेलताना पालकमंत्री गिरीश महाजन. समवेत उपस्थित पदाधिकारी.
बातम्या आणखी आहेत...