आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अपारदर्शकता दिसली तर कोणत्याही क्षणी गच्छंती, पालकमंत्री गिरीश महाजन यांचा इशारा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नाशिक मुख्यमंत्र्यांनी नाशिक दत्तक घेतल्यामुळे तसेच पारदर्शकतेच्या मुद्यावर नाशिककरांनी सत्ता दिली असून, महापाैर, उपमहापाैरच काय, परंतु काेणत्याही पदाधिकाऱ्याच्या कारभारात अपारदर्शकता, अनियमितता दिसली, भ्रष्टाचार झाला तर त्याची गच्छंती अटळ अाहे. त्यासाठी पद देण्यापूर्वीच तारीख टाकलेले राजीनामे हाती घेऊन टाकल्याचा गाैप्यस्फाेट पालकमंत्री गिरीश महाजन यांनी केला. 
 
महापाैर उपमहापाैरपदाच्या निवडीनंतर पत्रकारांशी बाेलताना महाजन म्हणाले की, नाशिककरांचा काैल लक्षात घेऊन विराेधी पक्षांनी अविराेध निवडीसाठी केलेल्या सहकार्याबाबत त्यांचे अाभारच अाहे, मात्र अाता शहराच्या विकासासाठी एकत्रित प्रयत्न झाले पाहिजे. भाजपचा भर पारदर्शक कारभारावर अाहे. रंजना भानसी या पाच वेळा नगरसेविका म्हणून निवडून अाल्या अाहेत. त्यांचा अनुभव दांडगा असून, महापाैरपदासाठी खऱ्या अर्थाने त्याच दावेदार हाेत्या. भाजपची सत्ता राबवताना पारदर्शी कारभार हेच मुख्य सूत्र असेल. त्यासाठी काेणाची हयगय केली जाणार नाही. काेणी भ्रष्टाचार केला, चुकीचे काम केले तर त्याला परत बाेलवले जाईल. त्यासाठी अाताच तारीख टाकलेले राजीनामे घेऊन टाकले असल्याकडे महाजन यांनी लक्ष वेधले. 
 
सव्वा वर्षाचाच कार्यकाळ 
दरम्यान, महापाैर उपमहापाैरपदाचा नेमका कार्यकाळ किती, याबाबत विचारले असताना महाजन यांनी प्रथम सव्वा वर्षाचा अडीच वर्षांचा असेल, असे माेघम सांगितले. मात्र, हाच प्रश्न पुन्हा विचारल्यावर त्यांनी सव्वाच वर्षाचा कार्यकाळ असे स्पष्ट केल्यामुळे नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना कमी वेळात स्वत:ला सिद्ध करण्याचे अाव्हान असेल. 
 
शहरासाठी देणार पूर्ण वेळ 
महापालिकेची सत्ता दिल्यानंतर महिन्यातून एकदा नाशिकमध्ये तळ ठाेकेन शहरासाठी संपूर्ण वेळ देईल, असे गिरीश महाजन यांनी जाहीर केले. याच पद्धतीने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही नाशिककरांना दिलेल्या अाश्वासनाची यानिमित्ताने अाठवण झाली. 
 
बारा वर्षांनी येणाऱ्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी साधुग्रामकरिता कायमस्वरूपी जागा देण्याबाबतचा मुद्दा उत्सवाच्या ताेंडावर चर्चेत येताे, मात्र अाता भाजपची सत्ता अाल्यानंतर केंद्रापासून तर महापालिकेपर्यंत असलेली सत्ता बघता याबाबत काय भूमिका असेल असे विचारले असता महाजन म्हणाले की, साडेतीनशे एकर जागा संपादन करण्याबाबत अंतिम टप्प्यात चर्चा अाली असून, लवकरच हा मुद्दा निकाली निघेल असे स्पष्ट केले. त्यासाठी किती कालावधी लागेल असे विचारल्यावर त्यांनी एक वर्षात कायमस्वरूपी साधुग्रामकरिता जागा मिळेल, असेही सांगितले. 
 
नऊ मीटरखालील रस्त्यांना टीडीअार नसणे, गावठाणात क्लस्टरला स्थगिती अादी बाबी नगरविकास खात्याच्या अखत्यारीत असून, मुख्यमंत्र्यांकडेच हीच खाती असताना नाशिकची काेंडी का, असा प्रश्न विचारल्यावर महाजन यांनी काही नियम शहर हिताच्या दृष्टीने केल्याचे सांगितले. भविष्यात शहर चांगल्या पद्धतीने विकसित व्हावे, हाच त्यामागचा हेतू अाहे. मात्र, लाेकहिताच्याविराेधात काेणताही निर्णय घेतला जाणार नाही. कपाट गावठाणाबाबत लवकरच ताेडगा निघेल. त्यादृष्टीने मुख्यमंत्र्यांसमवेत नाशिकमधील बिल्डर संघटनांच्या बैठका झाल्या असल्याकडे लक्ष वेधले. 
 
 
बातम्या आणखी आहेत...